Join us
Daily Top 2Weekly Top 5

21 वर्षांपूर्वी शाहरुख खानचा बॅकग्राऊंड डान्सर होता बॉलिवूडचा हा दिग्दर्शक, नाव वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 06:00 IST

याच बारक्या मुलाने संपूर्ण बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवले..

कोरियोग्राफर रेमो डिसूजा हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. पण हाच रेमो डिसूजा कधी काळी शाहरुख खानचा बॅकग्राऊंड डान्सर होता. 2018 मध्ये शाहरुख खानने एक रिअॅलिटी शोच्या मंचावर हा खुलासा केला होता.

 शाहरूख म्हणाला की हे गाणे त्याच्या सर्वात आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. शाहरूखने सांगितले की, ''त्यावेळी या गाण्यात बॅकग्राऊंडला सडपातळ तरूण मुलगा मागे नाचत होता, पण मला त्या मुलाचे नावही तेव्हा ठाऊक नव्हते. मात्र पुढे याच बारक्या मुलाने संपूर्ण बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवले. तो दुसरा तिसरा कोणी नसून आजघडीला भारतातील एक सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा आहे. रेमोने ऐवढे यश कला आणि मेहनतीच्या जोरावर मिळवले आहे. ऐवढेच नाही तर शाहरुखने रेमोच्या मागे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्ण देखील केली. ''

रेमोने अनेक सिनेमांचे दिग्दर्शन देखील केले आहे, स्ट्रिट डान्सर 3 D, रेस 3, ABCD अशा अनेक सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. आज तो बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक आहे. 

टॅग्स :रेमो डिसुझाशाहरुख खान