Join us

आज्या शितलीला देणार दिवाळीचे 'हे' सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:30 IST

एका वर्षापूर्वी चालू झालेल्या या मालिकेतील अज्या आणि शीतली सोबत प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. अज्या आणि शीतलीच्या लग्नानंतर लगेचच अज्या पोस्टिंग झाली आणि तो कामावर रुजू झाला.

ठळक मुद्देअज्या आणि शीतलीच्या लग्नानंतरचा हा पहिलाच दिवाळसण आहे

झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागिरं झालं जी'ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला जात आहे. एका वर्षापूर्वी चालू झालेल्या या मालिकेतील अज्या आणि शीतली सोबत प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. अज्या आणि शीतलीच्या लग्नानंतर लगेचच अज्या पोस्टिंग झाली आणि तो कामावर रुजू झाला. सध्या अजिंक्य काश्मीरमध्ये सीमेचं रक्षण करत आहे.

अज्या आणि शीतलीच्या लग्नानंतरचा हा पहिलाच दिवाळसण आहे आणि अजिंक्य इकडे नसल्यामुळे शीतली खूपच उदास आहे. पण शीतल तितकीच समंजस आहे. अजिंक्यने सीमेच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आहे त्यामुळे कुठलाही सण असो अजिंक्य तो सण साजरा करायला घरी येईल कि नाही याची शाश्वती नसणार आहे अशी समजूत शीतलने स्वतःच्या मनाला घातली आहे. पण अजिंक्य त्यांचा पहिला दिवाळसण खास बनवण्यासाठी शीतलला एक सरप्राईज देणार आहे. अजिंक्य स्वतः काश्मीरवरून घरी परत येणार आहे, पण याची कल्पना शीतलला नाही आहे.

टॅग्स :लागिरं झालं जी