Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? दिव्यांका त्रिपाठीला ऑफर झाला दयाबेनचा रोल? वाचा, काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 16:34 IST

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये बिझी आहे. आता दिव्यांकाबद्दल एक ताजी माहिती समोर येतेय.

ठळक मुद्दे‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये दिशा वकानीने दयाबेनची साकारली होती. तिची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. 

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi ) सध्या ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोच्या 11 व्या सीझनमध्ये बिझी आहे. केपटाऊन येथे या शोचे शूटींग सुरू आहे. आता दिव्यांकाबद्दल एक ताजी माहिती समोर येतेय. होय, दिव्यांकाला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत दयाबेनच्या (Dayaben) भूमिकेसाठी विचारणा झाली होती, असे कळतेय.‘Koimoi’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. दिव्यांकाला दयाबेनची भूमिका ऑफर केली गेली होती. पण तिने ही भूमिका करण्यास नकार दिला, असे या वृत्तात म्हटले आहे. अर्थात अद्याप दिव्यांकाने या वृत्तावर काहीही खुलासा केलेला नाही. त्यामुळे या बातमीत किती सत्यता आहे, हे दिव्यांकालाच माहित.

तूर्तास दिव्यांका केपटाऊनमध्ये  ‘खतरों के खिलाडी’च्या सेटवर धम्माल मस्ती करतेय. अलीकडे या शोचा एक प्रोमो रिलीज झाला होता. यात दिव्यांका एका मगरीला मांडीवर घेऊन दिसली होती. इतकेच नाही तर या मगरीला झोपवण्यासाठी ती अंगाई गीतही गाताना दिसली होती.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये दिशा वकानीने दयाबेनची साकारली होती. तिची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.   मात्र 2017 मध्ये प्रसूती रजा घेत तिने या मालिकेतून ब्रेक घेतला होता. तेव्हापासून ती या शोमध्ये परतलीच नाही. मधल्या काळात दिशा वकानीचा पती आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये दिशाच्या चित्रीकरणाच्या वेळा व मानधनावरून वाद झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच दिशाने निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्याचेही म्हटले गेले होते.दिशा वकानी मालिकेत नव्हती त्यावेळी निर्मात्यांनी तिच्या जागी दुस-या कोणालाही घेतले नाही. गोकुळधाममधील संपूर्ण महिलांमध्ये दिशा वकानी सर्वाधित फी घेते. केवळ महिलाच नाही तर येथे प्रत्येक कलाकारापेक्षा दिशा वकानी अधिक पैसे घेते. 

टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा