Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेकीच्या निधनानंतर ७ दिवसांनी दिव्या सेठ यांनी शेअर केली पोस्ट, कलाकारांसह सर्वच झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 11:24 IST

त्यांची लेक मिहिका फक्त २३ वर्षांची होती. तिच्या निधनाने दिव्या सेठ यांना धक्का बसला आहे.

हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या सेठ (Divya Seth)  यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. काही दिवसांपूर्वी त्यांची एकुलती एक मुलगी मिहिकाचं वयाच्या 23 व्या वर्षी निधन झालं. यामुळे दिव्या सेठ आणि कुटुंबीय प्रचंड धक्क्यात आहेत. तरुण मुलगी अशा प्रकारे अचानक जग सोडून गेल्याचा त्यांना विश्वासच बसत नाहीए. लेकीच्या निधनानंतर ७ दिवसांनी दिव्या सेठ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

दिव्या सेठ यांनी मुलीसोबतचा एक जुना सेल्फी शेअर केला आहे. यामध्ये दोघी मायलेकी खूप खूश दिसत आहे. त्यांची लेक मिहिका सुंदर दिसत असून तिची स्माईलही लाखात एक आहे. पण कोणाला माहित होतं की ही गोड मुलगी आता आपल्यात नसणार आहे. दिव्या सेठ यांनी या फोटोसोबत लिहिले, 'Thank you for being mine' (कायम माझीच राहण्यासाठी तुझे आभार'.

तरुण लेकीच्या निधनानंतर एका आईचं काय झालं असेल याची कोणी कल्पनाही करु शकत नाही. इंडस्ट्रीतील अनेक कलाकार कमेंट करत त्यांच्या दु:खात सामील झाले आहेत. दिव्या यांच्या पोस्टवर आलिया भटची आई सोनी राजदान यांनी कमेंट करत लिहिले, 'दिव्या तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी हे खरोखर विश्वास न बसणारं आणि हार्टब्रेकिंग आहे. अशा वेळी शब्द सुचत नाहीत. मिहिकाप्रमाणेच सतत तुझाही विचार आमच्यासोबत आहे. हे दु:ख स्वीकारणं खरोखरंच कठीण आहे.'

दिव्या सेठ यांनी पाच दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करत लेकीचं निधन झाल्याचं सांगितलं. मिहिकाला गंभीर आजार झाला होता. त्यातच हृदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला. यामुळे दिव्या सेठ यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडियापरिवारमृत्यू