Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिशा पटानीच्या सोशल मीडियावरील पोस्टने सा-या भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन येईल, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 10:46 IST

पहिल्यांदाच दिशाच्या एका पोस्टमुळे सारेच खूप कौतुक करताना दिसतायेत.

दिशा पटानी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. तिचे आगामी सिनेमा आणि वैयक्तिक जीवनातील घडामोडींवर तिच्या फॅन्सची नजर असते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही दिशा आपल्या फॅन्सशी नेहमीच संवाद साधत असते. स्वतःचे फोटो, व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससाठी शेअर करते. ब-याचदा तिच्या हटके ड्रेसिंग सेन्समुळे नेटिझन्स तिची  खिल्ली उडवतानाही दिसतात. मात्र पहिल्यांदाच दिशाच्या एका पोस्टमुळे सारेच खूप कौतुक करताना दिसतायेत.

 

दिशाने यावेळी  तिच्या बहिणीचा फोटो शेअर केला आहे. शेअर केलेला फोटोही खूप खास आहे. दिशाची बहिण भारतीय सैन्यात अधिकारी आहे. तिने बहिणीचा वर्दीमधील एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. खुशबू असे तिच्या बहिणीचे नाव आहे. हा फोटो पाहून तमाम भारतीयांची मान अभिमानानं उंचावल्याशिवाय राहणार नाही. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याला मोठी पसंती मिळत आहे. याआधीही दिशाने बहिणीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. पण वर्दीतील बहिणीच्या या फोटोची बातच  न्यारी आहे. 

 

दिशा पटानी येत्या ५ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'भारत'मध्ये दिसणार आहे. तसेच दिशा दिग्दर्शित मोहित सूरीच्या आगामी 'मलंग' आणि 'बागी ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिशा नेहमीच या गोष्टीमुळे असते चर्चेत !

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे ऐकायला मिळत आहे. दिशा आणि टायगर अनेक वेळा एकत्र पाहायला मिळतात. ते कधी लंच टेडवर जातात तर कधी पार्टींमध्ये एकत्र दिसतात. दिशा आणि टायगरमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याचे नेहमीच म्हटले जाते. सोशल मीडियावरदेखील नेहमीच त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगलेल्या असतात. पण दिशाने नेहमीच त्यांच्या नात्याबाबत मौन राखणेच पसंत केले आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान टायगरने  त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, सेलिब्रेटींच्या आयुष्याची चर्चा नेहमीच सगळीकडे सुरू असते. त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची इच्छा सगळ्यांना असते हे मला माहिती आहे. त्यामुळे दिशा आणि माझ्याकडे लोकांचे जास्तच लक्ष असते. आम्ही दोघे एकत्र खूप धमाल मस्ती करतो आणि एकमेकांची कंपनी एन्जॉय करतो. त्यामुळे या सगळ्या चर्चेचा आमच्या मैत्रीवर कधीही फरक पडत नाही. 

टॅग्स :दिशा पाटनीभारत सिनेमा