अभिनेत्री दिशा पटानी सतत या ना त्या कारणांनी चर्चेत असते. कधी टायगर श्रॉफमुळे, कधी आदित्य ठाकरेंसोबतच्या मैत्रीमुळे तर कधी हॉट फोटो व व्हिडीओंमुळे. मात्र आता यामुळे चर्चा होत नाहीये तर चक्क दिशा टायगरच्या बहिणीमुळे चर्चेत आली आहे. दिशा पटानीने नुकतीच डिनर डेटसाठी टायगर श्रॉफ याच्यासह न जाता त्याची बहिण कृष्णासोबत स्पॉट झाली.
यावेळी दिशा तिच्या बॉयफ्रेन्डसोबत गेली असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या. यासाठी मुंबईत हॉटेलबाहेर गर्दी पहायला मिळाली. दिशा आणि कृष्णाचे हातातहात घालून चालतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
दिशा पटानी आणि कृष्णा श्रॉफ या दोघांची चांगली मैत्री आहे. रेस्टॉरंटमध्ये जाताना या दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून चालत होत्या. डिनर डेटसाठी दिशाने क्रॉप टॉप आणि स्कर्टची निवड केली. तर टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने ब्लॅक टॉप ज्यामध्ये तिने डेनिम शॉर्ट्स आणि बूट्स परिधान केले होते. या दोघी डिनर डेटवर पोहचल्या नंतर त्यांच्यापाठोपाठ तिथे टायगर श्रॉफदेखील पोहचला. मात्र यावेळी दिशा कृष्णा आणि तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.