Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो, दिशा पटानीने केली नाकाची सर्जरी? ओळखणे झाले कठीण,Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 16:25 IST

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्येही दिशा पटानीच्या लूकमध्येही प्रचंड फरक जाणवत आहे. चेहराच बदलल्याचे पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या चेहर्‍याची शस्त्रक्रिया केली आहे. काहींची शस्त्रक्रिया ही खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाली आहे, तर काहींच्या बाबतीत त्यांचा चेहरा बराच खराब झाल्याचे दिसून आले आहे. अशा अभिनेत्रींना फार मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.याच यादी त आता दिशा पटानीही गणली जाणार असंच दिसतंय. कारण नुकतेच तिचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. 'अंतिम : द फायनल ट्रुथ’ या सिनेमाच्या स्क्रीनिंगला तिने हजेरी लावली होती. त्याचदरम्यानचा तिचा हा व्हिडीओ आहे. एरव्ही दिशा पटानी आपल्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ करायची. दिशा पटानी बॉलीवूडच्या बोल्ड अभिनेत्रीपैकी एक आहे.तिचा प्रत्येक अंदाज पाहून चाहते फुल ऑन फिदा व्हायचे. मात्र आता तिच्या नवीन लूकने चाहत्यांना मात्र चांगलाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.दिशा पटानीचा हा नवीन लूक सध्या तिच्या फॅन्सच्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्येही दिशाच्या लूकमध्येही प्रचंड फरक जाणवत आहे. चेहराच बदलल्याचे पाहायला मिळत आहे. नेमकं तिनं असं काय केलंय की उपस्थितांनासुद्धा दिशाला ओळखणंही कठीण झाले होते.दिशाने तिच्या नाकाची सर्जरी केली आहे. या सर्जरीमुळेच तिच्या चेहऱ्यात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाकाची सर्जरी केल्यामुळे चेहरा पूर्वीसारखा दिसत नाही. तिला ओखळणंही अशक्य झाल्याने सोशल मीडियावर दिशाला ट्रोलही केले जात आहे.

 

''जशी होती तशी सुंदर दिसत होती''. ''अधिक सुंदर दिसण्याच्या नादात वाट लावली'', ''तिने चेहरा बराच खराब केलाय'' अशा कमेंट्स तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा हा नवीन लूक पाहून चाहत्यांना अजिबात आवडला नाहीय. दिशाचा नवीन लूक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आगामी काळात वेगळ्या भूमिकेतून दिशा रसिकांच्या भेटीला येणार आहे. . ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा सिनेमा २८ जुलै २०२२ मध्ये रसिकांच्या भेटीला येणार आहे. हा अॅक्शन थ्रिलर पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

टॅग्स :दिशा पाटनी