Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिग्दर्शक विक्रम भट यांच्या लेकीनं बांधली लग्नगाठ; जाणून घ्या कोण आहे कृष्णाचा पती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 14:30 IST

विक्रम भट यांची मुलगी कृष्णा भटने तिचा दीर्घकाळचा बॉयफ्रेंड वेदांत सारदासोबत मुंबईत लग्नगाठ बांधली.

दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता विक्रम भट यांची मुलगी कृष्णा भटने तिचा दीर्घकाळचा बॉयफ्रेंड वेदांत सारदासोबत मुंबईत लग्नगाठ बांधली. तिच्या खास दिवसासाठी, कृष्णाने सोनेरी  पारंपारिक लेहेंगा निवडला आणि त्यावर हेवी ज्वेलरी परिधान केली होती. तर वेदांतने पांढऱ्या रंगाच्या शेरवानीची निवड केली होती. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी त्यांनी डेट करायला सुरुवात केली त्याच दिवशी दोघांनी लग्न केले होते. 

कोण आहे कृष्णा भट?दिग्दर्शक-निर्माता विक्रम भट आणि अदिती भट यांची मुलगी कृष्णा भट स्वतः एक दिग्दर्शक आणि निर्माती आहे. तिने 2012 मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपला प्रवास सुरू केला आणि 'हॉन्टेड 3D', 'क्रिएचर 3D', 'मिस्टर एक्स', 'खामोशियां'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 'अंकुर अरोरा मर्डर केस' आणि 'हेट स्टोरी 2' साठी सहाय्यक लेखक म्हणूनही काम केले आहे.

दिग्दर्शक म्हणून कृष्णाचा पहिला चित्रपट '1920: हॉरर्स ऑफ द हार्ट' आहे. या चित्रपटात 'बालिका वधू' स्टार अविका गोर, मॉडेल-अभिनेता राहुल देव, बरखा बिश्त, रणधीर राय, दानिश पांडोर, केतकी कुलकर्णी, अमित बहल आणि अवतार गिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

टॅग्स :विक्रम भट