Join us

दिग्दर्शक केदार शिंदे २५ वर्षानंतर दुसऱ्यांदा अडकले लग्नबेडीत, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 15:45 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक केदार शिंदे पंचवीस वर्षांनंतर दुसऱ्यांदा लग्नबेडीत अडकले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक केदार शिंदे पंचवीस वर्षांनंतर दुसऱ्यांदा लग्नबेडीत अडकले आहेत. केदार शिंदे यांनी नुकतेच आपल्या पत्नीसोबतच पुन्हा लग्न केले आहे. त्यांच्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

केदार शिंदे यांनी नुकतेच लग्नाच्या २५ व्या वाढदिवसादिवशी पत्नी बेलासोबत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. हा विवाहसोहळा ९ मे रोजी घरातच पार पडला. यावेळी अंकुश चौधरी, शर्मन जोशी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला मराठी आणि हिंदी कलाकारांनी व्हिडीओ कॉलद्वारे हजेरी लावली होती. या विवाह सोहळ्याबद्दल वसुंधरा साबळे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत सांगितले आहे. 

काल सकाळी आपापल्या घरी आम्ही केदारचे सर्व नातेवाईक आणि त्याची मीत्रमंडळी रवीवार असुनही ११ वाजताचा मुहूर्त चुकू नये...

Posted by Vasundhara Sable on Sunday, May 9, 2021

केदार शिंदे आणि बेला शिंदे यांनी पळून जाऊन लग्न केल्यामुळे पहिल्या लग्नात कन्यादानाचा विधी पार पडला नव्हता. या लग्नात लॉकडाउनमुळे बेलाचे आई वडिल येऊ शकले नाहीत. त्यामुळे या लग्न सोहळ्यात कन्यादान आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी केले. तसेच या लग्नाबद्दल केदार शिंदे आणि बेला शिंदे यांची लेक सना हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, आई-बाबांचा कधी साखरपुडा झाला नव्हता. हळदीचा कार्यक्रम पार पडला नव्हता, एकत्र राहण्यासाठीची वचन घेण्यासाठी त्यांनी मुहूर्त पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना ही स्पेशल भेट द्यायचे ठरविले. लग्नसोहळा नाही तर लग्न महत्त्वाचे असते हे पटवून देण्यासाठी आई-बाबा तुमचे आभार.

केदार शिंदे आणि बेला शिंदे यांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 

टॅग्स :केदार शिंदेअंकुश चौधरीआदेश बांदेकरशरमन जोशीसिद्धार्थ जाधव