Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मन उडू उडू झालं' मालिका सोडण्याबाबत दिपू उर्फ हृता दुर्गुळेनं केला मोठा खुलासा, म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 18:59 IST

Hruta Durgule: हृता दुर्गुळेच्या लग्नाच्या आधीपासूनच ती ही मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा या चर्चेला सोशल मीडियावर जोर धरला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका मन उडू उडू झालं प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिकेमध्ये आपल्याला दिपू आणि इंद्रा यांची प्रेम कहाणी पाहायला मिळत आहे. या मालिकेमध्ये अजिंक्य राऊतने इंद्राची भूमिका साकारली आहे तर दिपूची भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. ही जोडी प्रेक्षकांना खूप भावते आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने नुकतेच प्रियकर प्रतीक शहासोबत लग्न केले आणि सध्या ती हनीमून एन्जॉय करते आहे. दरम्यान पुन्हा एकदा हृता दुर्गुळे मालिका सोडणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.  

हृता दुर्गुळेच्या लग्नाच्या आधीपासूनच ती ही मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा या चर्चेला सोशल मीडियावर जोर धरला आहे. मात्र, याबाबत आता अभिनेत्रीने स्वतः स्पष्टीकरण दिले आहे, मी सध्या लग्न झाल्यानंतर हनिमूनसाठी बाहेर आलेली आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की मी मालिका सोडेल. मी ही मालिका आवर्जून करणार आहे. कारण या मालिकेसोबत माझी खूप चांगल्या प्रकारे बाँडिंग जमलेले आहे. सर्वच कलाकार देखील खूप चांगल्या प्रकारे वागतात. 

सोशल मीडियावर तिने आपल्या हनीमूनचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोवर अनेकांनी कमेंट केलेल्या आहेत. एका व्यक्तीने अशी कमेंट करून मालिकेत परत कधी येणार की मालिका सोडली अशी विचारणा केली होती. त्यावर स्पष्टीकरण देऊन सांगितले की, मी ही मालिका सोडलेली नाही. मी लवकरच आपल्याला मालिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :ऋता दूर्गुळेझी मराठी