Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेकअपशिवाय ही तितकीच सुंदर दिसते मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 16:47 IST

सोनालीने शेअर केलेल्या या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफविषयी  माहिती देत असते. नुकतेच सोनालीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिचा लूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सोनालीने शेअर केलेल्या या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण या फोटोत तिने अजिबातच मेकअप केलेला नाहीये. पण तरीही सोनाली खूपच छान दिसत आहे. सोनालीचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. विशेष म्हणजे सोनालीचा हा फोटो दिग्दर्शक संजय जाधव यांनी काढला आहे. 

सोनाली कुलकर्णी हिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झिम्मा या तिच्या चित्रपटाने अलीकडेच चित्रपटगृहात यशस्वी १०० दिवस पूर्ण केले आहेत. बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटाने अशी गौरवास्पद कामगिरी केली आहे . लवकरच ती व्हिक्टोरिया या चित्रपटात दिसणार आहे. 

सोनालीचा जन्म पुण्यात झालासोनाली कुलकर्णी हिचा जन्म 18 मे 1988 रोजी पुण्यातील लष्करी छावणीमध्ये झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात 30 वर्षे काम केल आहे. तिची आई सविंदर ही पंजाबी असल्यामुळे तिच्या बोलण्यातून या भाषेचा ठेहराव दिसतो.सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. तिने पु्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. पुण्याच्याच इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

'बकुळा नामदेव घोटाळे' सिनेमातून केलं पदार्पणसोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'नटरंग' या चित्रपटातून. या चित्रपटात तिने केलेले लावणीनृत्य प्रचंड गाजले. यानंतर सोनालीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी