Join us

राधिका आपटेचे मुंबईतील घर पाहिलंत का?, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 17:15 IST

सध्या राधिका आपटे लंडनमध्ये आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री राधिका आपटे हिने स्थान निर्माण केले आहे. राधिका सिनेइंडस्ट्रीत बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. सध्या ती लंडनमध्ये आहे. तिचे मुंबईतील वर्सोवा येथे स्वतःचे घर आहे. या घराचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. 

राधिका आपटेचे वर्सोवा येथे २ बीएचके फ्लॅट असून तिने घर खूप छान सजविले आहे. राधिकाच्या घराचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. कमी सामान आणि फोटो  फ्रेमने घराच्या भिंतीची सजावट करण्यात आली आहे. 

२००५ मध्ये राधिकाने वाह, लाईफ हो तो ऐसी या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर शोर इन द सिटी, कबाली, बदलापूर, मांझी- द माऊंटेन मॅन अशा अनेक चित्रपटांत राधिका दिसली आहे.

हिंदी चित्रपटांशिवाय राधिकाने मराठी, तेलगू, तामिळ, मल्याळम चित्रपटातही काम केले आहे. राधिकाला खरी ओळख शोर इन द सिटीमधून मिळाली आहे.

राधिका अ कॉल टू स्पाय या इंटरनॅशनल चित्रपटात झळकली आहे. यात ती नूर इनायत खान नामक हेरची भूमिका साकारताना दिसली.

 

तिच्यासोबत विर्जिना हॉलच्या भूमिकेत सारा मेघन थॉमस आहे.

नूर व विर्जिनाची निवड वेरा अॅटकिन्स वर्ल्ड वॉर टूच्या मिशनसाठी निवड करतो.

या सिनेमाची स्टोरी वर्ल्ड वॉर टूमधील महिला हिरोंची माहित नसलेली स्टोरी दाखवण्यात आली आहे.

टॅग्स :राधिका आपटे