Join us
Daily Top 2Weekly Top 5

"जेव्हा प्रयोग असेल डोंबिवली ला.. तेव्हा पकडा डोंबिवली fast.." या मराठमोळ्या अभिनेत्रीने केला चक्क ट्रेनने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 17:57 IST

सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींसुद्धा कधी कधी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते.

सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींसुद्धा कधी कधी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अनेकवेळा शुटिंग स्थळी पोहचण्यासाठी अनेकदा कलाकार मंडळी कधी मेट्रो तर कधी ट्रेन तर कधी रिक्षाने प्रवास करत असल्याचे पाहायला मिळते. 

अगदी असाच वेगळा प्रवास मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्रिया मराठेने केला आहे. प्रियाने यावेळी बसने नाही, रिक्षाने ही नाही तर चक्क ट्रेनने प्रवास केला आहे. तिने ट्रेनमधून प्रवास करताना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत प्रिया ट्रेनमध्ये बसलेली दिसतेय. Local lo baat.. #mumbailifeline #mumbailocal जेव्हा प्रयोग असेल डोंबिवली ला.. तेव्हा पकडा डोंबिवली fast. असे कॅप्शन दिलं आहे. प्रियाने दिलेले हे कॅप्शन तिच्या चाहत्यांना फारच आवडलं आहे.  सध्या प्रिया “तिला काही सांगायचंय!”  आणि अ परफेक्ट मर्डर या दोन मराठी नाटकांमध्ये काम करतेय. 

तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली.याशिवाय कसम से या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली.'बडे अच्छे लगते' है,कॉमेडी सर्कसमध्येही प्रिया झळकली. तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही एंट्री मारली. या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती.

टॅग्स :प्रिया मराठे