Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ मल्होत्राने स्टुडंट ऑफ द इयर नव्हे तर या मालिकेद्वारे केले होते अभिनयक्षेत्रात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 16:32 IST

सिद्धार्थने चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी एका मालिकेत काम केले होते.

ठळक मुद्देधरती का वीर योद्धा - पृथ्वीराज चौहान ही रजत टोकसची मुख्य भूमिका असलेली मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत सिद्धार्थने एक छोटीशी भूमिका साकारली होती. या मालिकेत तो जयचंद या भूमिकेत दिसला होता.

सिद्धार्थ मल्होत्राने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्याच्यासोबत वरुण धवन आणि आलिया भट मुख्य भूमिकेत होते. पहिल्याच चित्रपटापासून सिद्धार्थला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले. या चित्रपटानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. आता तर सिद्धार्थला चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले असून बॉलिवूडमध्ये त्याने त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, सिद्धार्थने त्याच्या करियरची सुरुवात चित्रपटांपासून नव्हे तर एका मालिकेपासून केली होती आणि ही मालिका त्या काळातील प्रचंड प्रसिद्ध मालिका होती. तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे खरे आहे की, सिद्धार्थने चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी एका मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्याची भूमिका ही छोटीशी असल्याने या भूमिकेला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. 

धरती का वीर योद्धा - पृथ्वीराज चौहान ही रजत टोकसची मुख्य भूमिका असलेली मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत सिद्धार्थने एक छोटीशी भूमिका साकारली होती. या मालिकेत तो जयचंद या भूमिकेत दिसला होता. सिद्धार्थने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडलिंगद्वारे केली होती. तो एक प्रसिद्ध मॉडेल होता. मॉडलिंगच्याच काळात त्याने या मालिकेत काम केले होते. पण त्याची ही भूमिका तितकीशी लोकांच्या लक्षात राहिली नाही.

सिद्धार्थ मल्होत्राचा अय्यारी हा चित्रपट काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. यानंतर आता तो जबरीयाँ जोडी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणिती चोप्राची जोडी जमणार आहे. या चित्रपटाचे सध्या तो जोरदार प्रमोशन करत असून या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच झाला. हा ट्रेलर सिद्धार्थ आणि परिणिती यांच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे. या चित्रपटात या दोघांसोबतच अपारशक्ती खुराणा, संजय मिश्रा, नीरज सूद, गोपाल दत्त, जावेद जाफ्री यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्रा