Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अग्गंबाई सूनबाई'मध्ये अनुरागची भूमिका साकारणाऱ्या चिन्मयची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 07:00 IST

अभिनेता चिन्मय उद्गीरकरची ‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेत एंट्री झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता चिन्मय  उद्गीरकरची ‘अग्गंबाई सूनबाई’ मालिकेत एंट्री झाली आहे.  चिन्मय या मालिकेत ‘अनुराग गोखले’ नावाची भूमिका साकारताना दिसतो आहे. अनुरागची एंट्रीने मालिकेत नवं वळण मिळलं आहे. शुभ्राच्या आयुष्यात अनुरागची भूमिका नेमकी काय असणार याविषयी येणा-या भागांमध्ये रसिकांना पाहायला मिळेल. रसिकांचा लाडका चिन्मय पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला आल्याने त्याच्या चाहत्यांचा आनंद नक्कीच द्विगुणित झाला असणार. आज आम्ही तुम्हाला चिन्मयच्या खासगी आयुष्य विषयी काही गोष्ट सांगणार आहोत. 

तुम्हाला माहिती आहे का चिन्मयची पत्नी ही अभिनेत्री आहे. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की,  चिन्मयने अभिनेत्री गिरीजा जोशीसोबत लग्न केले आहे. विराज राजे यांनी दिग्दर्शित केलेल्या वाजलीच पाहिजे या चित्रपटात चिन्मय उद्गीरकर व गिरिजा जोशी यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटात काम करताना चिन्मय व गिरिजा यांच्यातील मैत्री वाढली व मैत्रीचे रूपांतर विवाहबंधनात झाले. या विवाह सोहळ्याप्रसंगी चित्रपट व नाट्यसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली होती.

अभिनेत्री गिरिजा जोशीने सतीश मोतीलिंग दिग्दर्शित 'प्रियतमा' या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिचे देऊळ बंद, वाजलीच पाहिजे असे तिचे चित्रपट प्रदर्शित झाले. चिन्मय स्वप्नांच्या पलीकडले आणि  नांदा सौख्यभरे या मालिकेतून घराघरात पोहोचला. मालिकांसोबत त्याने अनेक चित्रपटांमध्ये ही काम केले आहे. 

टॅग्स :चिन्मय उद्गगिरकर