Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अग्गंबाई सूनबाई'मध्ये सोहमची भूमिका साकारणाऱ्या अद्वैत दादरकरची पत्नी आहे ही प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 17:29 IST

अव्दैतची पत्नी देखील अभिनयक्षेत्रात असून तिने तिच्या अभिनयगुणांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

अग्गंबाई सूनबाई या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामालिकेतील प्रत्येक पात्र  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. यात सोहमची भूमिका साकाणारा अव्दैत दादरकर खऱ्या आयुष्यातही विवाहीत आहे. अव्दैतची पत्नी देखील अभिनयक्षेत्रात असून तिने तिच्या अभिनयगुणांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

अद्वैतने मालिकांसोबतच अनेक मराठी नाटकांमध्ये देखील काम केले आहे. त्याची पत्नी देखील त्याच्याप्रमाणेच मराठी रंगभूमीवरील एक प्रसिद्ध कलाकार आहे. अद्वैत दादरकरची पत्नी भक्ती देसाई असून तिच्या तू म्हणशील तसं या नाटकाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या नाटकांचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले असून या नाटकाची निर्मिती प्रशांत दामले यांनी केली होती. तसेच या नाटकात तिच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे महत्त्वाच्या भूमिकेत होता. या नाटकातील भक्तीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

भक्तीने नाटकांप्रमाणेच मालिकेत देखील काम केले आहे. झी मराठीवरील अरुंधती या प्रसिद्ध मालिकेत ती मुख्य भूमिकेत झळकली होती. अद्वैत आणि भक्ती यांना एक मुलगी असून त्या दोघांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिचे फोटो पाहायला मिळतात. तिचे नाव मीरा असून ती खूपच गोंडस आहे.

अद्वैत आणि भक्ती दोघे एकमेकांना कॉलेज जीवनापासूनच ओळखतात. कॉलेजमध्ये असताना तो नाटकाचे दिग्दर्शन करायचा तर भक्ती नाटकात काम करायची. त्यामुळेच त्या दोघांचा परिचय झाला. काहीच महिन्यात त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि काही वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :अग्गंबाई सूनबाई