Join us
Daily Top 2Weekly Top 5

बालकलाकार म्हणून केली होती या मराठमोळ्या अभिनेत्रीने सुरुवात, हिंदी मालिकांमध्येही आजमावलंय नशीब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 08:10 IST

मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होतो.

 मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसेचा (Neha Pendse) समावेश होतो.  खुप कमी वेळात तिने टीव्ही आणि सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'मे आय कम इन मॅडम' ही तिची लोकप्रिय मालिका. 'भाभी जी घर पर हैं' मधील आपल्या सौंदर्याने अभिनेत्री नेहा पेंडसे(Nehha Pendse)ने सर्वांना वेड लावले होते. अभिनेत्री नेहा पेंडसेचा आज ३९ वा वाढदिवस.

नेहा पेंडसेने लहान वयातच अभिनयाला सुरुवात केली. १९९९ मध्ये आलेल्या 'प्यार कोई खेल नहीं' या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून डेब्यू केला होता.  यानंतर ती संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटात दिसली होती. एकता कपूरच्या 'कॅप्टन हाऊस' या शोमधून तिने टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. 'लाइफ ओके' वाहिनीवरील 'मे आय कम इन मॅडम?' मध्ये तिने काम केले. या मालिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली. भाग्यलक्ष्मी मध्ये केलेल्या तिच्या भुमिकेचे खुप कौतुक झाले. या मालिकेतुन ती घराघरात पोहोचली. यानंतर तिने अनेक मालिका, चित्रपटांत काम केले. नेहा ने सलमान खानच्या बिग बॉस १२ मध्येही एंट्री घेतली होती. त्यातही तिने आपली ठसा उमटवला होता. मात्र ती पहिल्याच राऊंड मध्ये एलिमिनेट झाली होती.

२०२० मध्ये नेहाने बॉयफ्रेंड 'शार्दुल बायस' सोबत लग्न केले. त्यांचे लग्न हा देखील चर्चेचा विषय होता. शार्दुलचा आधी दोन वेळा घटस्फोट झाला होता. त्याला एक मुलगी सुद्धा आहे. यावरुन नेहाला ट्रोल केले होते. पण नेहाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तरं दिली होती.  

टॅग्स :नेहा पेंडसे