एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी आणि नंतर अध्यात्माच्या मार्गावर गेलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २०२५ च्या महाकुंभमेळ्यात 'महामंडलेश्वर' बनून सर्वांना चकित करणाऱ्या ममता कुलकर्णीनं आता आपल्या साध्वी अवतारातून 'ब्रेक' घेतल्याचे दिसत आहे. सध्या ती गोव्यामध्ये आपल्या मैत्रिणींसोबत सुट्टीचा आनंद लुटताना दिसली. तिचे गोवा ट्रीपचे ग्लॅमरस व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये ममता कुलकर्णी भगव्या वस्त्रांत नसून तिच्या जुन्या अवतारात दिसत आहेत. गोव्याच्या समुद्रकिनारी मैत्रिणींसोबत मौजमजा करताना ती स्वतःचे व्हिडीओ शूट करत आहेत. तब्बल २५ वर्षांनंतर ती भारतात आली असून अलीकडेच ती 'लाफ्टर शेफ ३' च्या सेटवरही दिसली होती. मात्र, गोव्यातील हा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
नेटकऱ्यांचा संतापममताचा हा बदललेला लूक पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर आला आहे. एका युझरने विचारले, "चंदनाचा टिळा पुसून भगवी वस्त्रं बाजूला ठेवलीत का?" तर दुसऱ्याने थेट "बनावट साध्वी" अशी टीका केली आहे. मात्र, काही चाहत्यांनी तिच्या गळ्यातील रुद्राक्षाकडे लक्ष वेधत त्या अजूनही अध्यात्माशी जोडलेल्या असल्याचे म्हटले आहे.
Web Summary : Actress Mamta Kulkarni, once a 'Mahamandaleshwar,' is seen in Goa with friends, ditching her spiritual attire. Videos of her glamorous vacation went viral, drawing mixed reactions. Some fans trolled her for abandoning her spiritual path, while others pointed out her continued connection to spirituality.
Web Summary : कभी 'महामंडलेश्वर' बनीं ममता कुलकर्णी दोस्तों के साथ गोवा में दिखीं, जहाँ उन्होंने आध्यात्मिक पोशाक त्याग दी। उनकी ग्लैमरस छुट्टियों के वीडियो वायरल हो गए, जिससे मिली-जुली प्रतिक्रियाएं आईं। कुछ प्रशंसकों ने आध्यात्मिक मार्ग छोड़ने के लिए उन्हें ट्रोल किया, जबकि अन्य ने अध्यात्म से उनके निरंतर संबंध को बताया।