छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका बालिका वधूमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री अविका गौर आणि तिचा सहकलाकार मनिष रायसिंगन यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा ऐकायला मिळते आहे. ती ससुराल सिमर का मालिकेतील सहकलाकार मनिष रायसिंघनच्या मुलाची आई होणार असल्याची अफवा सगळीकडे पसरली होती. अखेर आता या सर्व उलटसुलट चर्चांमागचे सत्य अविकाने सांगितले आहे.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}ससुराल सिमर का मालिकेतील सहकलाकार मनिष रायसिंघन यांच्यासोबत अफेअर असल्याच्या चर्चांचा अविका गौरला खूप मनस्ताप होत होता. शेवटी अविका आणि मनिषने एकमेकांपासून अंतर राखून राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे अविकाने सांगितले. ती पुढे म्हणाली की, इतकेच काय दोन आठवडे आम्ही एकमेकांशी साधे बोलतही नव्हतो. सर्वात कहर म्हणजे मी लपूनछपून मनिषच्या मुलाची आई झाले, अशा अफवा पसरवण्यापर्यंत प्रेक्षकांची मजल गेली होती.
अविका गौरने पुढे म्हटले की, एका आर्टिकलमध्ये प्रकाशित झाले होते की आम्ही बाळ लपवून ठेवले आहे. हे अशक्य आहे. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. अजूनही माझ्या आयुष्यात त्यांच्यासाठी कायमच महत्त्वाची जागा असेल. वयाच्या १३ व्या वर्षापासून आतापर्यंत माझ्या प्रवासात ते माझे सर्वात जवळचे मित्र राहिले आहेत. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. ते माझ्यापेक्षा १८ वर्षांनी मोठे आहेत. त्यांनी स्वतःमधील लहान मूल कसे जपले आहे, हे पाहून मी खूप थक्क झाले. अजूनही काही जण मला विचारतात, तुमच्यामध्ये काही सुरु आहे का? ते माझ्या वडिलांपेक्षा काही वर्षांनीच लहान आहेत.
सुरुवातीला या चर्चांचा आम्हाला खूप त्रास झाला. बरेच दिवस आम्ही एकमेकांशी बोललोही नाही. मात्र नंतर आम्हाला कळून चुकले, की अंतर राखून वागण्यात काहीच अर्थ नाही. आता जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो तेव्हा आमच्या अफवांवर आम्हालाच हसू येते, असे अविका गौरने सांगितले.
अभिनेता मनिष रायसिंघननेही एका मुलाखतीत म्हटले होते की, आपली पत्नी संगीता जेव्हा पहिल्यांदा भेटली, तेव्हा तिलाही वाटले होते, की मी आणि अविका कपल आहोत. मी तिला स्पष्ट सांगितले की आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आमची केमिस्ट्री पाहून कोणालाही आम्ही रिलेशनशीपमध्ये आहोत, असे वाटेल असे ती म्हणाली होती. मात्र मैत्रीपलिकडे आमच्यात काही नाही, असे मी संगीताला सांगितले होते.