Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदा शर्माने विकत घेतलं का सुशांत सिंग राजपूतचं घर?, सोडलं मौन, म्हणाली - "त्याचा फ्लॅट पाहायला गेली तेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 11:48 IST

Adah Sharma : मागील वर्षी अदा शर्मा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अपार्टमेंटच्या बाहेर दिसली होती, जिथे अभिनेता २०२० मध्ये त्याच्या मृत्यूपूर्वी राहत होता. तेव्हापासून, अभिनेत्रीला ती तो फ्लॅट खरेदी करणार आहे का, असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे.

मागील वर्षी अदा शर्मा (Adah Sharma) दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput)च्या अपार्टमेंटच्या बाहेर दिसली होती, जिथे अभिनेता २०२० मध्ये त्याच्या मृत्यूपूर्वी राहत होता. तेव्हापासून, अभिनेत्रीला ती तो फ्लॅट खरेदी करणार आहे का, असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. योग्य वेळ आल्यावर या विषयावर बोलायला आवडेल, असे अदाने आता सांगितले आहे. 

सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत, अदा शर्माने अपार्टमेंट खरेदी करण्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, 'सध्या मी एवढेच सांगू इच्छिते की मी प्रत्येकाच्या हृदयात राहते. बोलण्यासाठी योग्य वेळ आहे. ते ठिकाण बघायला गेल्यावर मीडियाचे लक्ष पाहून मी भारावून गेले. मी एक खासगी व्यक्ती आहे. मला माझ्या चित्रपटांसाठी लोकांच्या नजरेत राहायला आवडते. पण मी नेहमीच खासगी राहिले. मी माझ्या प्रायव्हसीचे रक्षण केले आहे.

अदा शर्मा सुशांत सिंग राजपूतबद्दल म्हणाली...तिच्या भावना पुढे व्यक्त करताना, अभिनेत्रीने सुशांत सिंग राजपूतच्या अपार्टमेंट विकल्याबद्दल ऑनलाइन केलेल्या नकारात्मक टिप्पण्यांबद्दल तिची निराशा व्यक्त केली. जो आता आपल्यासोबत नाही अशा व्यक्तीबद्दल वाईट बोलणे चुकीचे आहे, विशेषत: सुशांत सिंग राजपूत सारख्या एखाद्या व्यक्तीबद्दल, ज्याने उल्लेखनीय चित्रपटांसह चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदान दिले आहे, असे ती म्हणाली.

अदा शर्माला आवडत नाही ही गोष्ट अदाने म्हटले की, ती तिच्यावर होणारी टीका हाताळू शकते, परंतु जे लोक स्वतःचा बचाव करू शकत नाहीत अशा लोकांना लक्ष्य केले जाते, ते मला आवडत नाही. योग्य वेळ आल्यावरच या प्रॉपर्टीच्या मुद्द्यावर बोलणार असल्याचे तिने सांगितले. पण सध्या ती लाखो लोकांच्या हृदयात राहते हे जाणून तिला आनंद झाला आहे.

टॅग्स :अदा शर्मासुशांत सिंग रजपूत