Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर २' आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार नाही; रणवीर सिंगचा चित्रपट कुठे पाहता येईल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 15:44 IST

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'चा दमदारटीझर प्रेक्षकांच्या भेटीला , रिलीज डेटही समोर

Dhurandhar 2 OTT Release: बॉलिवूडचा पॉवरहाऊस अभिनेता रणवीर सिंग सध्या चर्चेत आहे. त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'धुरंधर' बॉक्स ऑफिस आणि ओटीटीवर धुमाकूळ घालतोय. यातच निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची म्हणजेच 'धुरंधर: द रिव्हेंज'ची अधिकृत घोषणा केली आहे. मात्र, दुसऱ्या भागाच्या रिलीजपूर्वी निर्मात्यांनी काही मोठे आणि अनपेक्षित बदल केले आहेत. 

'धुरंधर'चा पहिला भाग सध्या नेटफ्लिक्सवर नंबर १ वर ट्रेंड करत असला, तरी सिक्वेलसाठी निर्मात्यांनी आपला ओटीटी स्ट्रीमिंग पार्टनर बदलला आहे. 'धुरंधर २' चे ओटीटी अधिकार जिओ हॉटस्टारने विकत घेतले आहेत. याचा अर्थ असा की, चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर नाही, तर जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळेल. यासोबतच संगीताचे हक्कही 'सारेगामा'कडून आता 'टी-सीरीज' कडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे.

निर्मात्यांनी आज चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज केला. टीझरच्या शेवटी रणवीरचा एक संवाद विशेष लक्ष वेधून घेतो, तो म्हणतो, "ये नया हिंदुस्तान है, ये घरमें घुसेगा भी और मारेगा भी". टीझरमध्ये अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि संजय दत्त यांचीही झलक पाहायला मिळते.  शांत, साध्या स्वभावाचा हमजा 'धुरंधर' कसा झाला, याचा प्रवास 'धुरंधर पार्ट २'मध्ये दिसणार आहे.

१९ मार्चला 'टॉक्सिक'शी होणार  टक्कर"धुरंधर: द रिव्हेंज" ची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक' चित्रपटही प्रदर्शित होत असल्याने बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या सुपरस्टार्समध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.

स्टारकास्टमध्ये कोणाचा समावेश?दुसऱ्या भागात रणवीर सिंगसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पहिल्या भागात महत्त्वाच्या भूमिकेत असलेला अक्षय खन्ना दुसऱ्या भागात असेल की नाही, याबाबत निर्मात्यांनी अद्याप सस्पेन्स कायम ठेवला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar 2' Not on Netflix; Where to Watch Ranveer's Film?

Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar 2' shifts to Jio Hotstar, not Netflix. The film's teaser reveals a March 19, 2026 release, clashing with Yash's 'Toxic'. Sanjay Dutt, Arjun Rampal, and R. Madhavan also star.
टॅग्स :धुरंधर सिनेमानेटफ्लिक्सरणवीर सिंग