Dhurandhar 2 Box Office Collection: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २'ने प्रदर्शित होताच अख्खं मार्केटच खाऊन टाकलं आहे. पहिल्याच दिवशी 'धुरंधर २'ने बॉक्स ऑफिसवर धुव्वा उडवला आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच 'धुरंधर २'ने १०० कोटींच्या पेक्षाही जास्त कमाई केली आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातही सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. 'धुरंधर २'च्या पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
१९ मार्चला 'धुरंधर २' सर्वत्र प्रदर्शित झाला होता. पण, १८ मार्चला संध्याकाळी ५ वाजल्यापासूनच 'धुरंधर २'चे पेड प्रिव्ह्यू शो आयोजित करण्यात आले होते. यामुळे सिनेमाच्या कमाईत प्रचंड वाढ झाल्याचं दिसत आहे. अॅडव्हान्स बुकिंगचाही 'धुरंधर २'ला चांगलाच फायदा झाला आहे. गुरुवारी पेड प्रिव्ह्यू शोमधून 'धुरंधर २'ने तब्बल ४३ कोटींचा गल्ला जमवला. तर प्रदर्शनाच्या दिवशी १०२ कोटींचा बिजनेस या सिनेमाने केला आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने १४५ कोटी कमावले आहेत.
'धुरंधर २' हा सिनेमा हिंदी, तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. यापैकी सगळ्यात जास्त कमाई हिंदी व्हर्जनमुळे झाली आहे. जवळपास ९९ कोटींचा गल्ला 'धुरंधर २' हिंदीने मिळवून दिला आहे. 'धुरंधर २'ने परदेशात ६४ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जगभरात 'धुरंधर २'ने तब्बल २३६ कोटी कमावले आहेत.
'धुरंधर २'ची स्टारकास्ट
डिसेंबर २०२५मध्ये 'धुरंधर' प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता सिनेमाचा सीक्वल प्रदर्शित करण्यात आला आहे. 'धुरंधर २'मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. त्याने हमजा अली मदारीची भूमिका साकारली आहे. तर संजय दत्त, सारा अर्जुन, आर माधवन, अर्जुन रामपाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Web Summary : Aditya Dhar's 'Dhurandhar 2' shattered box office records, earning ₹145 crore in India and ₹236 crore worldwide on its opening day. The film, starring Ranveer Singh, saw significant success in its Hindi version and overseas markets.
Web Summary : आदित्य धर की 'धुरंधर 2' ने बॉक्स ऑफिस के रिकॉर्ड तोड़ दिए, भारत में ₹145 करोड़ और अपने पहले दिन विश्व स्तर पर ₹236 करोड़ कमाए। रणवीर सिंह अभिनीत इस फिल्म को हिंदी संस्करण और विदेशी बाजारों में महत्वपूर्ण सफलता मिली।