Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या लग्नात ओक्साबोक्शी रडले अभिनेता धर्मेंद्र, ईशाने शेअर लग्नातील 'तो' व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 17:14 IST

या व्हिडीओत तुम्हाला खूप सारे इमोशनल क्षण पाहायला मिळतील.

ईशा देओलच्या लग्नातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ इशानेच सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ इशाच्या पाठवणीचा आहे. यात नवरीच्या साजश्रृगांरामध्ये ईशा दिसते आहे. लाल रंगाच्या साडीत ईशा भावूक होऊन उभी आहे. या व्हिडीओमध्ये मागे तिचा पती भरत तख्तानीसुद्दा दिसतो आहे. ईशा सोबतच वडील धर्मेंद्र, आई हेमा मालिनी आणि छोटी बहीण अहाना देओलसुद्धा दिसतेय.

या व्हिडीओत तुम्हाला खूप सारे इमोशनल क्षण पाहायला मिळतील. सासरी चालेली ईशा अचानक भावूक होते आणि वडील धर्मेंद्र यांना मिठी मारुन रडू लागते. वडील धर्मेंद्रसुद्धा मुलीच्या पाठवणीच्या वेळी भावूक झालेला दिसतात. बाप-लेकीचा हा व्हिडीओ पाहताना नकळत डोळ्यात अश्रू उभे राहतात. ईशा आई हेमा मलिनी यांनाही बिलगते आणि रडते. 

ईशा देओलने २०१२ साली भरत तख्तानीसोबत लग्न केले होते. आता लग्न झाल्यानंतर ईशा नवीन पाऊल टाकते आहे. ती मुलांच्या संगोपनातील अनुभवावर पुस्तक लिहित आहे. या पुस्तकाचे नाव आहे अम्मा मिया. ही माहिती तिने स्वतः ट्विटरवर दिली होती. २००३ मध्ये इशाने मेरे दिल से पूछे सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. यानंतर ती , LOC कारगिल, काल, नो एंट्री सारख्या सिनेमांमध्ये दिसली होती.

टॅग्स :इशा देओलधमेंद्रहेमा मालिनी