Join us

‘कोलावरी डी’नंतर धनुषच्या ‘राऊडी बेबी’ने तोडले सर्व रेकॉर्ड, युट्यूबवर 100 कोटी व्ह्युज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 11:09 IST

अभिनेता धनुषच्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ

ठळक मुद्देधनुष आणि धी यांनी ‘मारी 2’ चित्रपटातील राउडी बेबी हे गाणे गायले आहे. हे गाणे 25 ऑक्टोबर 2018 मध्ये प्रदर्शित झाले होते.

‘कोलावरी डी’ हे दोन शब्द आठवले तरी आठवतो तो अभिनेता धनुष.धनुषच्या ‘कोलावरी डी’ हे गाणे तुफान गाजले होते. एका दिवसात दहा लाख हिट्सचा विक्रम या गाण्याने केला होता. या गाण्याची जादू आजही कायम आहे. आता धनुषच्या आणखी अशाच एका गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. होय, त्याचे ‘राऊडी बेबी’ हे गाणे युट्यूबवर हिट ठरले आहे. धनुषच्या ‘मारी 2’ या चित्रपटातील या गाण्याने नेटक-यांना वेड लावले आहे.  या गाण्यात तो अभिनेत्री साई पल्लवीसोबत डान्स करताना दिसत आहे. या गाण्याने युट्यूबवर नुकताच 100 कोटी व्ह्युजचा टप्पा पार केला. 100 कोटी व्ह्युजचा टप्पा पार करणारे साऊथमधील हे पहिले गाणे ठरले आहे.

‘राऊडी बेबी’ला मिळत असलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून खुद्द धनुषही भारावला आहे. चाहत्यांचे आभार मानत त्याने एक ट्विटही केले आहे.

‘काय मस्त योगायोग आहे. राउडी बेबी या गाण्याला 100 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.  याच दिवशी 9 वर्षांपूर्वी माझ्या वाय धिस कोलावर डी या गाण्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. हे पहिले दाक्षिणात्य गाणेआहे ज्याला युट्यूबवर 100 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.  सर्व चाहत्यांचे मनापासून आभार, ’ अशा आशयाचे ट्विट धनुषने केले आहे. त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर ... हे दोन हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

रजनीकांत यांचा जावई आहे इतक्या कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक, आकडा वाचून तुम्हाला येईल भोवळ

म्हणून स्वत:ला खोलीत कोंडून घ्यायचा अभिनेता धनुष!! 

धनुष आणि धी यांनी ‘मारी 2’ चित्रपटातील राउडी बेबी हे गाणे गायले आहे. हे गाणे 25 ऑक्टोबर 2018 मध्ये प्रदर्शित झाले होते. युवन शंकर राजा याने संगीतबद्ध केलेले या गाण्याचे बोल स्वत: धनुषने लिहिले आहे. हे गाणे युट्यबवर सर्वाधिक पाहिले जाणारे गाणेठरलेआहे. असाच काहीसा रेकॉर्ड धनुषच्या ‘कोलावरी डी’ या गाण्याने केला होता. 

टॅग्स :धनुष