Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवीच्या 'धडक'चा ट्रेलर पाहून काय म्हणाला अर्जुन कपूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 11:09 IST

मराठीतील सुपरहिट सैराट या सिनेमाचा धडक हा हिंदी रिमेक असून यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. पण बॉलिवूडच्या कलाकारांनी जान्हवी आणि इशानचं भरभरून कौतुक केलं आहे. 

मुंबई : जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या 'धडक'च्या ट्रेलरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. मराठीतील सुपरहिट 'सैराट' या सिनेमाचा 'धडक' हा हिंदी रिमेक असून यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तर बॉलिवूडच्या कलाकारांनी जान्हवी आणि इशानचं भरभरून कौतुक केलं आहे. 

जान्हवीची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या हा ट्रेलर पाहू न शकल्याने जान्हवी दु:खी आहे पण कपूर परीवारातील सगळे सदस्य जान्हवीला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रेलर लॉन्चवेळी हजर होते. श्रीदेवी यांच्यांनंतर अर्जून कपूर आणि जान्हवी यांच्यातील बॉंडिंगही चांगलं जमलं आहे. तो जान्हवीला सतत सपोर्ट करत असतो. धडकच्या ट्रेलर येण्याआधीही अर्जूनने जान्हवीसाठी मेसेज लिहिला होता. आता त्याने ट्रेलर पाहिल्यावर आणखी एक पोस्ट केली आहे. 

एकीकडे धडकच्या ट्रेलरला काहींनी पसंती दिली आहे तर काहींनी याला नापसंती दिली आहे. खासकरुन सैराट बघितलेल्यांनी या ट्रेलरला नापसंती दर्शवली आहे. पण काहींचं मत आहे की, केवळ ट्रेलरवरुन दोन्ही कलाकारांच्या कामाबद्दल काही बोलण्यापेक्षा सिनेमा रिलीज झाल्यावर बोलावं. येत्या 20 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे.  

टॅग्स :धडक चित्रपटअर्जुन कपूर