Join us
Daily Top 2Weekly Top 5

'देवों के देव महादेव' मधील पार्वती अडकली लग्नबंधनात! शाही विवाहसोहळ्यातील व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 10:55 IST

शुभमंगल सावधान! अभिनेत्री सोनारिका भदोरिया अडकली लग्नाच्या बेडीत, फोटो व्हायरल

सध्या मनोरंजनविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करत आहेत. आता 'देवो के देव महादेव' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. या मालिकेत पार्वती ही भूमिका साकारून अभिनेत्री सोनारिका भदोरिया प्रसिद्धीझोतात आली. सोनारिका नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. 

सोनारिकाने उद्योगपती विकास पराशारबरोबर रविवारी(१८ फेब्रुवारी) विवाह केला.  लग्नासाठी सोनारिकाने लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. तर विकास पराशार याने सूट घातला होता. त्यांच्या शाही विवाहसोहळ्यातील खास क्षणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत सोनारिका आणि विकास आयुष्यातील सगळ्यात खास क्षण अनुभवताना दिसत आहेत.  सोनारिकाने तिच्या हळदीचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. 

सोनारिकाने अनेक मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे. 'तुम देना साथ' मेरा, 'इश्क मे मरजावा', 'दास्तान ए मोहब्बत' अशा मालिकांमध्ये ती झळकली. पण, 'देवो के देव महादेव' मालिकेने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. याशिवाय  'हायपर', 'सासें', 'हिंदुत्व' या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंग