Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांदा आई होणार देवोलिना? ६ महिन्यांनी पुन्हा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांवर भडकली गोपी बहू, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:47 IST

लग्नानंतर २ वर्षांनी देवोलिनाच्या घरी पाळणा हलला. आता पुन्हा देवोलिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गोपी बहू दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. 

टीव्हीची गोपी बहू म्हणजे अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. २०१४च्या डिसेंबर महिन्यात अभिनेत्रीने गोंडस लेकाला जन्म दिला. लग्नानंतर २ वर्षांनी देवोलिनाच्या घरी पाळणा हलला. आता पुन्हा देवोलिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गोपी बहू दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. 

देवोलिनाने तिच्या सोशल मीडियावरुन पतीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. फोटो पाहून अभिनेत्री डिलिव्हरीनंतर ६ महिन्यांतच पुन्हा गरोदर असल्याचं बोललं जात होतं. या चर्चा ऐकून देवोलिना भडकली आहे. देवोलिनाने नुकतंच टेली टॉकला मुलाखत दिली. यावेळी तिने दुसऱ्यांदा गरोदर नसल्याचं स्पष्ट केलं. देवोलिना म्हणाली, "आई होऊन मला फक्त ६ महिने झाले आहेत. मी एवढ्या लवकर पुन्हा गरोदर कशी असेन. ही अफवा आहे. हे लोक काहीही न्यूज बनवतात". 

दरम्यान, देवोलिनाने २०२२ साली शाहनवाज शेखसोबत लग्न केलं होतं . आंतरधर्मीय विवाह केल्याने देवोलिनाला ट्रोलही करण्यात आलं होतं. देवोलिनाचा पती शाहनवाज हा एक जीम ट्रेनर आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी देवोलिना आणि शाहनवाज आईबाबा झाले. देवोलिनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, 'साथ निभाना साथिया'मुळे तिला लोकप्रियता मिळाली. 'लाल इश्क', 'छटी मैया की बिटिया' या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'बिग बॉस', 'डान्स इंडिया डान्स' या रिएलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. 

टॅग्स :देवोलिना भट्टाचार्जीटिव्ही कलाकार