Join us

'देवमाणूस' फेम किरण आणि वैष्णवीची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रात, व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:06 IST

Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar : किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरने लग्नानंतर त्यांचा पहिला सण मकरसंक्रांत साजरी केली. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यांनी चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad)ने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर(Vaishnavi Kalyankar)सोबत १४ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, आता लग्नानंतर त्यांचा पहिला सण मकरसंक्रांत त्या दोघांनी साजरी केली. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यांनी चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

किरण गायकवाडने मकर संक्रांत साजरा केल्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, म……. मराठमोळा सण, क…… कणखर बाणा, र…… रंगीबिरंगी तिळगुळ, सं…… संगीतमय वातावरण, क्रा…… क्रांतीची मशाल…, त …… तळपणारे तेज, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. या व्हिडीओत पाहायला मिळतंय की, किरण गायकवाडने पतंग, मांज्याचं प्रिंट असलेले काळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला आहे. तर वैष्णवीने काळ्या रंगाची नववारी साडी नेसलीय. त्यावर लाल रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे. तसेच तिने हलव्याचे दागिने घातले आहेत. या गेटअपमध्ये वैष्णवी खूपच सुंदर दिसते आहे. दोघे एकमेकांना तीळाचे लाडू भरवताना दिसत आहेत. त्यानंतर दोघे पतंगही उडवताना दिसले. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

किरण आणि वैष्णवीची पहिली भेट 'देवमाणूस' या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, किरण गायकवाडने 'लागिर झालं जी', 'देवमाणूस' या मालिकांबरोबरच अनेक मालिकांमध्ये काम केले. मराठी चित्रपटातही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'चौक', 'फकाट', 'बघतोस काय मुजरा कर' आणि 'डंका हरिनामाचा' या चित्रपटात तो झळकला आहे तर वैष्णवी कल्याणकर सुद्धा अभिनेत्री असून तिने 'तू चाल पुढं', 'देवमाणूस २' या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती 'तिकळी' मालिकेत काम करते आहे.

टॅग्स :किरण गायकवाड'देवमाणूस २' मालिका