Join us

दीपिका पदुकोण आहे कोट्यवधींची मालकीण; वाचून तुम्हीही व्हाल हैराण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 16:43 IST

यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिका १०व्या क्रमांकावर आहे. दीपिकाची यंदाची कमाई ४८ कोटी रुपये असल्याचा दावा फोर्ब्सने केला.

दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्यामुळे दीपिका या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण सध्या दीपिका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. अलीकडेच फोर्ब्सने जारी केलेल्या यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिका १०व्या क्रमांकावर आहे. दीपिकाची यंदाची कमाई ४८ कोटी रुपये असल्याचा दावा फोर्ब्सने केला. पण दीपिका चित्रपटातून कोट्यवधीची कमाई करते, असा तुमचा अंदाज असेल तर तो चुकीचा आहे. कारण केवळ अ‍ॅक्टिंग नाही तर तिचे आणखीही अनेक बिझनेस आहे. 

अनेक बिझनेसमध्ये तिने पैसा गुंतवला आहे. नुकतीच दीपिकाने इलेक्ट्रिक टॅक्सी स्टार्टअप ब्ल्यू स्मार्टमध्ये ३० लाख डॉलरची गुंतवणूक केली. यापूर्वी ड्रम्स फूड आणि एक स्पेस टेक्नॉलॉजी स्टार्टअप ऐरोस्पेसमध्येही तिने पैसे गुंतवले आहेत.  याशिवाय अनेक ब्रँडच्या जाहिराती, फोटोशूट आणि सोशल मीडिया शेअरिंग मधूनही दीपिका कोट्यवधी रुपये कमावते. दीपिका मिंत्रा,तनिष्क, लॉरेल अशा अनेक बड्या ब्रँडशी जुळलेली आहे.

दीपिकाने २०१८च्या नोव्हेंबरमध्ये अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्न केले. लग्नानंतर तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे यंदा तिची कमाई काहीशी कमी झालीय. गत वर्षी फोर्ब्सच्या यादीत दीपिका ४ व्या क्रमांकावर होती. यंदा ती थेट १० व्या स्थानावर घसरली. रणवीरने मात्र यंदा या यादीत ८व्या क्रमांकावरून ७ व्या क्रमांकावर उडी घेतली.  

टॅग्स :दीपिका पादुकोणछपाकफोर्ब्स