Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका कक्करच्या पती शोएब इब्राहिमला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पाहून तुम्हीही म्हणाल सो रोमँटीक....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 14:57 IST

शोएबने आपल्या आई-वडिलांसह वाढदिवस सेलिब्रेशनचा फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे.

'बिग बॉस 12'ची विजेती दीपिका कक्करने पती शोएब इब्राहिमचा फोटो शेअर करत बाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिने फक्त फोटोच शेअर नाही केला तर एक खास मेसेजही लिहीला आहे. तिने लिहीले आहे की, ''माझ्या आयुष्याला ज्याच्यामुळे ख-या अर्थाने अर्थ मिळाला त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.'' शोएबने  आपल्या आई-वडिलांसह वाढदिवस सेलिब्रेशनचा फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे. एका फोटोमध्ये शोएबच्या हातात गिफ्ट दिसत आहे . यावेळी त्याच्या चेह-यावर आनंदही द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले. 

 

 

खरं तर दीपिका आणि शोएब एकत्र काम करता करता प्रेमात पडले. 'ससुराल सिमर का' या मालिकेत हे दोघे मुख्य भूमिकेत होते. ब-याचदा  रिलेशनशिपबाबत या दोघांना विचारले जायचे. मात्र दोघांनीही मौनच पाळले होते. अखेर  दोघांनी तीन वर्षांपासून एकमेंकांच्या प्रेमात असल्याची जाहिर कबुली दिली होती.

 

दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमने 'नच बलिये' या कार्यक्रमात देखील एकत्र भाग घेतला होता. या कार्यक्रमानंतर दोघांनी लग्न केले होते. 23 फेब्रुवारी 2019 ला दोघांनी आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती.

टॅग्स :दीपिका कक्कर