Join us
Daily Top 2Weekly Top 5

दमदार कथेला कॉमेडीचा तडका, बहुचर्चित 'डेडपूल 3' चा धमाकेदार टिझर एकदा बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 12:26 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून ज्याची उत्सुकता होती अशा 'डेडपूल 3' चा टिझर आज भेटीला आलाय

 'डेडपूल 3' (Deadpool 3) सिनेमाची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा आहे. यावेळी  'डेडपूल 3' निमित्ताने लोगन आणि डेडपूल एकत्र येणार अशी चर्चा होती. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला होती.  'डेडपूल 3' (Deadpool & Wolverine) चा पहिला टिझर कधी येणार याची प्रेक्षक वाट बघत होते.  अशातच प्रतीक्षा संपली आहे.  'डेडपूल 3'  चा पहिला टिझर रिलीज झालाय . मार्व्हलचे सिनेमे गेल्या अनेक महिन्यांपासून बॉक्स ऑफीसवर अपेक्षित कामगिरी करु शकले नाहीत. त्यामुळे मार्व्हलस् सिनेमांचा तारणहार अशी  'डेडपूल 3' ची ओळख सांगण्यात आलीय.

'डेडपूल 3' च्या टिझरमध्ये दिसतं की, वेड विल्सन त्याच्या कुटुंबासोबत मजेत वेळ घालवताना दिसतो. अशातच त्याचं दार कोणीतरी ठोठावतं. वेडला कोणीतरी घेऊन जायला आलं असतं. मार्व्हलस् च्या सुपरहिरोंचा बॉस अशी जबाबदारी वेडला मिळते. मग पुढे संकटांचा सामना करता करता वेड बेशुद्ध होतो. आणि त्याला वाचवायला व्हॉलवरिन येतो. डेडपूलवर लोगन अर्थात व्हॉलवरिनची सावली पडलेली दिसते. 

अशाप्रकारे 'डेडपूल 3' च्या कथेला विनोदाची फोडणी दिलेली दिसतेय. 'डेडपूल 3' हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू मध्ये रिलीज होणार आहे. २६ जुलैला 'डेडपूल 3' अर्थात डेडपूल अँड व्हॉलवरिन हा सिनेमा रिलीज होणार आहे. 'डेडपूल 3' मध्ये रियान रेनॉल्डस, ह्यूज जॅकमॅन, मोरेना बकेरीन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 'डेडपूल 3' मध्ये डेडपूल  व्हॉलवरिनसोबत काय धम्माल करणार, यासाठी प्रेक्षकांना २६ जुलै पर्यंत वाट बघावी लागणार आहे.

टॅग्स :हॉलिवूड