आपल्या मुलांनी आपल्यासारखचं किंवा त्याही पेक्षा कित्येक पटीने जास्त नाव कमवावं असं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. परंतु आईवडीलांच्या प्रचंड प्रसिद्धी वलयाच्या बाहेर पाय ठेऊन वेगळी वाट निवडणं हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. आपल्या प्रमाणेच आपल्या मुलांचही नाव मोठं व्हावं, पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटावा हे प्रत्येक पालकांना वाटतंच असंत. अशी अभिमानास्पद गोष्ट एका अभिनेत्यासोबतही घडली आहे. आणि हे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे(Sharad Ponkshe). शरद सध्या त्यांच्या आयुष्यातील अत्यंत अभिमानचा क्षण अनुभवतायेत. कारण शरद यांच्या लेकीने त्यांचं स्वप्न पूर्ण केले आहे.
शरद पोंक्षे यांच्या लाडक्या लेकीने पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण केले आहे. शरद यांनी सोशल मीडियावर लेकीसोबतचे फोटो शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. फेसबुकवर पोस्ट शेअर करत त्यांनी ‘सिद्धी शरद पोंक्षे आज प्रायव्हेट पायलट झाली.असंख्य अडचणीतून मार्ग काढत ती इथपर्यंत पोहोचली. अभिनंदन सिद्धी,’ अशी भावूक पोस्ट त्यांनी लिहिली आहे.