Join us
Daily Top 2Weekly Top 5

जया प्रदा यांनी दलीप ताहिलवर उगारला होता हात? इतक्या वर्षांनी अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 17:00 IST

दलीप ताहिल यांनी एका चित्रपटातील इंटिमेट सीन शूट करताना त्यांची मर्यादा ओलांडली त्यामुळे संतापलेल्या जयाप्रदा यांनी सर्वांसमोर अभिनेत्यावर हात उगारला होता असं बोललं जायचं.

बॉलिवूड अभिनेते दलीप ताहिल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अलिकडेच दलीप ताहिल यांना 2018 च्या एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१८ मध्ये घडलेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी  2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा  त्यांना सुनावण्यात आली आहे. याच दरम्यान, अभिनेता आणखी एका कारणाने चर्चेत होता. खरं तर, अलिकडेच काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, अभिनेत्री जया प्रदा यांनी एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दलीप ताहिल यांच्या कानशिलात लगावली होती. आता अभिनेत्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 दलीप ताहिल यांनी सिद्धार्थ काननशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. दलीप ताहिल यांनी एका चित्रपटातील इंटिमेट सीन शूट करताना त्यांची मर्यादा ओलांडल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे संतापलेल्या जयाप्रदा यांनी सर्वांसमोर अभिनेत्यावर हात उगारला होता. यावर प्रतिक्रिया देताना दलीप ताहिल यांनी जयाप्रदा यांच्यासोबत काम केलेल्या चित्रपटाचे नाव विचारले. कारण, अभिनेत्याने कधीही जयाप्रदासोबत काम केले नाही.

दलीप ताहिल म्हणाले- 'या बातम्या वाचून मला धक्का बसला. मी जयाप्रदा जींचा खूप आदर करतो. त्या इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. पण, तेव्हापासून मला सतत प्रश्न पडतो की, मी जयाजींसोबत कोणता चित्रपट केला आहे? तो कोणता चित्रपट होता हे कोणी मला सांगितले तरच कळेल. कारण, माझ्या आठवणीनुसार, मी त्याच्यासोबत कधीही स्क्रीन शेअर केलेली नाही.

दलीप ताहिल पुढे म्हणाले, '.माझ्या माहितीनुसार मी त्यांच्यासोबत काम केलेलं नाही.दलीप पुढे म्हणाले की, इंडस्ट्रीतील मी अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांनी नेहमीच महिलांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. 

टॅग्स :दलिप ताहिलजया प्रदा