'दगडी चाळ २' हा सिनेमा 2020मध्ये  रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे समजतंय. नुकतेच 'दगडी चाळ २ '  शूटिंग सुरू झाले आहे. 'दगडी चाळ २' मध्ये पुन्हा अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांची अधिकच फुलत जाणारी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले आहे.  तर या चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे.  तर डॅडी यांच्या भूमिका मकरंद देशपांडे साकारत आहे. नुकतेच डॅडी बनत मकरंद देशपांडे समोर आला. डॅडीच्या रूपात मकरंदला पाहातचा सारेच थक्क झाले. यावेळी साक्षात समोर डॅडीच आहेत असेच जणू  सा-यांना वाटले असणार. हुबेहुब डॅडीच्या रूपातील मकंरदला पाहून त्याचे सा-यांनीच कौतुक केले.
 २०१५ साली आलेल्या 'दगडी चाळ' या अरुण गवळी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा ''दगडी चाळ २' हा सिक्वल आहे.  ‘चुकीला माफी नाही’ हा मकरंद देशपांडेचा डायलॉग विशेष गाजला होता. त्यामुळे पुन्हा हाच दरारा रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'दगडी चाळ' मध्ये डॅडी हे वास्तविक पात्र असलं तरी कथा काल्पनिक होती. दुसऱ्या भागाची कथादेखील डॅडीभोवती फिरणार असून कथा काल्पनिक असणार आहे. या चित्रपटात काय नवीन पाहायला मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेच. आपल्या अदाकारीने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी पूजा सावंत आगामी 'दगडी चाळ २' चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही आनंदाची बातमी पूजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती. त्याचबरोबर या चित्रपटाचा टीजर  प्रदर्शित केला होता.
'दगडी चाळ २ ' या चित्रपटाची निर्मिती संगीता अहिर आणि क्रिश अहिर यांनी केली असून शूटिंग सुरू झाले आहे.