Join us
Daily Top 2Weekly Top 5

Birthday Special : वडिलांच्या 'त्या' फोनने बदलले आयुषमान खुराणाचे नशीब, किस्सा वाचून तुम्हीही व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 10:53 IST

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा आज 36 वर्षांचा झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणा आज 36 वर्षांचा झाला आहे. 14 सप्टेंबर 1984 साली चंडीगढला त्याचा जन्म झाला. आज आयुष्यमान खुराणा आजघडीला इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे. आयुष्यमानला प्रचंड फॅन फॉलाईंग आहे. ‘विकी डोनर’ ते ‘शुभ मंगल जादा सावधान’पर्यंत त्याच्या भूमिकांना लोकांनी डोक्यावर घेतले.  

आयुषमान हा मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी आहे. चित्रपटात येण्यापूर्वी पाच वर्षे तो थिएटर करत होता. आयुषमान एमटीव्हीवर येणा-या रोडिज या शोच्या दुस-या सीझनचा विजेता होता. अनेक दिवस रेडिओ जॉकी म्हणूनही त्याने काम केले. बिग एफएमवर ‘बिग चाय, मान ना मान मैं तेरा आयुष्यमान’ नावाचा रेडिओ शो त्याने होस्ट केला होता.

 

वडिलांच्या त्या फोनने बदलले आयुष्य

आयुषमानने  एका मुलाखती दरम्यान त्याच्या आयुष्याशी निगडीत एक किस्सा शेअर केले होता. आयुषमान म्हणाला, मी दिल्लीत शिक्षण पूर्ण झाल्यावर रेडिओ जॉकीचे काम करत होता. तेव्हा एक दिवस अचानक माझ्या वडिलांचा मला फोन आला आणि त्यानंतर माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेले.  

एक दिवस अचानक माझ्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी मला मुंबईला जायला सांगितले. हे ऐकून माझं सहकारी हैराण झाले की इकडे सगळं काही ठिक चालू असताना अचनाक मुंबईला का जायचंय. मात्र मी वडिलांच्या सांगण्याप्रमाणे मुंबईत निघून आलो आणि त्यादिवसानंतर मी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आयुषमानचे वडील एक प्रसिद्ध ज्योतिषार्चाय आहेत. मा

आयुषमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. ताहिराच्या वडिलांना आयुष्यमान खूप आवडायचा. हा मुलगा तुला खूप आनंदी ठेवेन, असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.

बर्लिन फिल्म फेस्टिवलच्या निर्णयाचे आयुष्यमान खुराणाने केले स्वागत !

 

 

टॅग्स :आयुषमान खुराणा