Join us

डब्बू रत्नानीने चोरली इंटरनॅशनल फोटोग्राफरची कल्पना? कियाराचा TOPLESS फोटो नव्या वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 14:29 IST

बॉलिवूडचा सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी दरवर्षी सेलिब्रिटी कॅलेंडर लॉन्च करतो. दरवर्षी या कॅलेंडरची चर्चा रंगते. नेहमीप्रमाणे ती यावर्षीही रंगली. पण जरा वेगळ्या कारणाने. 

बॉलिवूडचा सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी दरवर्षी सेलिब्रिटी कॅलेंडर लॉन्च करतो. दरवर्षी या कॅलेंडरवर बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रिटी वेगवेगळ्या ग्लॅमरस पोजमध्ये झळकतात. कॅलेंडर लॉन्च झाल्यावर दरवर्षी या कॅलेंडरची चर्चा रंगते. नेहमीप्रमाणे ती यावर्षीही रंगली. पण जरा वेगळ्या कारणाने. होय, बॉलिवूडचे सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीचे 2020 चे कॅलेंडर लॉन्च झाले आणि ते चर्चेत आले. कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर, सनी लिओनी अशा अभिनेत्रींनी या कॅलेंडरसाठी टॉपलेस पोज दिली आणि सोशल मीडियावर खमंग चर्चा रंगली. विशेषत: कियारा अडवाणीच्या टॉपलेस फोटोने तर इंटरनेटवर धुमाकूळ घातला. या फोटोवर इतके भन्नाट मीम्स व्हायरल झालेत की लोकांचे हसून हसून पोट दुखले. आता मात्र या टॉपलेस फोटोवरून नवा वाद समोर आला आहे. होय, डब्बू रत्नानीने या फोटोचा कॉन्सेप्ट चोरल्याचा आरोप होतोय.

 टॉपलेस फोटोत कियारा एका पानाच्या आड उभी आहे. फोटोग्राफ मेरी बार्शने या फोटोवर आक्षेप घेत, इन्स्टाग्राम स्टोरीवर डब्बूची पोलखोल केली आहे. डब्बूने आपल्या कॅलेंडरसाठी आपला कॉन्सेप्ट चोरल्याचा आरोप तिने केला आहे. याचा खुलासा करताना, ‘मी यापेक्षा अधिक काहीच बोलू इच्छित नाही, ’ असे मेरीने लिहिले आहे.

सोबत कोलाजही आहे. यात एकीकडे कियारा आहे आणि दुसरीकडे एक मॉडेल. दोघींची पोज सारखी आहे. मेरीने अनेक शहरात फॅशन व ब्युटी इंडस्ट्रीत काम केले आहे.मेरीच्या या आरोपावर डब्बूने अद्याप काहीही उत्तर दिलेले नाही. तो यावर काय बोलतो, काय स्पष्टीकरण देतो, ते बघूच.

टॅग्स :डब्बू रतनानीकियारा अडवाणी