Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दार उघड बये’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, मुक्ताने शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाली- देवीआई सोबत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 13:59 IST

साधारण वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या ‘दार उघड बये’ या मालिकेने ३०० भाग पूर्ण केल्यानंतर नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

झी मराठी’ वाहिनीवरील ‘अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली दार उघड बये’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेची कथा संबळवादक मुक्ताचा संघर्षावर आधारित आहे. साधारण वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या  ‘दार उघड बये’ या मालिकेने ३०० भाग पूर्ण केल्यानंतर नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 

 या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. मुक्ता, रावसाहेब, आजी आणि रेणुका हे कलाकार नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चेत येत असतात. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. त्यानिमित्त मुक्ता हे प्रमुख पात्र साकारणारी अभिनेत्री सानिया चौधरी भावुक झाली असून ती सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

सानियाची पोस्ट‘मुक्ता‘ चा वर्षभराचा अविस्मरणीय प्रवास आज संपला .उद्यापासून मुक्ता तुमच्या भेटीला नसेल... या कथेला जरी पूर्णविराम मिळत असला, तरी ‘मुक्ता ‘ माझ्यामध्ये कायमची सामावली गेली आहे.  खंबीर ,बेधडक, अन्याय सहन न करणारी, पण तितकीच प्रेमळ ,गोड आणि हळवी ! आपली कला आणि नाती सुधा जीवापाड जपणारी मुक्ता ! जिने कलेवर जिवापाड प्रेम करणं नव्याने शिकवलं ....मुक्ताचे खूप खूप आभार ! मला मुक्ता साकारायला मिळाली म्हणून आणि प्रेक्षकहो तुमचे सुधा आभार, कारण तुमच्या प्रेमाने मला शेवटच्या भागापर्यंत त्याच उत्साहाने मुक्ता साकारण्याची ताकद दिली. संपूर्ण मालिकेत माझे सगळ्यात जास्त scenes shoot झाले ते संबळ आणि देवीआई सोबत ! मालिकेची सुरुवात मी संबळ वाजवत झाली आणि शेवट ही संबळ वाजवतच झाला ..यांना अंतर कसं देणार? म्हणून सेटवरुन माझ्या जिवाभावाच्या या दोन्ही गोष्टी : संबळ आणि देवी आई चा मुखवटा हक्काने माझ्या सोबत घरी घेऊन आले ....! आता त्या कायम माझ्याजवळ असतील आणि ‘मुक्ता’ कायम माझ्या मनात असेल ...!!

 

‘दार उघड बये’ मालिकेत सानिया चौधरीसह रोशन विचारे, शरद पोंक्षे, किशोरी आंबिये, भाग्यश्री दळवी आदींनी महत्वाची भूमिका साकारली आहे.  

टॅग्स :झी मराठी