Join us

चर्चांना पूर्णविराम! ऋतुराज गायकवाड लग्नबंधनात अडकला, सायली संजीव म्हणाली, "तुमच्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 10:43 IST

ऋतुराजला क्लीन बोल्ड करणारी उत्कर्षा पवार आहे तरी कोण?

मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) नुकताच लग्नबंधनात अडकला. उत्कर्षा पवारसह (Utkarsha Pawar)  त्याने लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झालेत. एकीकडे ऋतुराजने नात्याविषयी खुलासा केला तेव्हाच चर्चांना उधाण आलं होतं. कारण ऋतुराजचं नाव मराठी अभिनेत्री सायली संजीवसोबत (Sayali Sanjeev) जोडलं जात होतं. आता सायलीने ऋतुराजचा वेडिंग फोटो शेअर करत नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

महाबळेश्वरच्या निसर्गरम्य सौंदर्यात ली मेरिडियन रिसॉर्टमध्ये ऋतुराज आणि उत्कर्षाचा विवाहसोहळा पार पडला. दोघांनीही लग्नासाठी व्हाईट थीम ठेवलेली दिसली. उत्कर्षाने पांढऱ्या रंगाचा भरजरी लेहेंगा आणि ऋतुराजने पांढऱ्या लग्नाचीच शेरवानी घातली होती. तर लग्नाच्या विधीवेळी उत्कर्षाने हिरव्या रंगाचा शालू परिधान केला होता. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाले. सेलिब्रिटींनी तसंच चाहत्यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी सायली संजीवनेही इन्स्टाग्राम स्टोरी ठेवत ऋतुराजला शुभेच्छा दिल्या. 'तुमच्यासाठी खूप खूश आहे. दोघांचेही अभिनंदन' असं कॅप्शन तिने दिलं आहे.

कोण आहे उत्कर्षा पवार ?

ऋतुराजने आपल्या लेडीलव्हसोबत लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यामुळे त्याच्या आणि सायली संजीवच्या चर्चा अखेर थांबल्या. पण ऋतुराजला क्लीन बोल्ड करणारी उत्कर्षा आहे तरी कोण? ऋतुराजने पहिल्यांदा नात्याचा खुलासा करताच अनेकांना त्याची गर्लफ्रेंड मॉडेल किंवा अभिनेत्री आहे असं वाटलं होतं. पण उत्कर्षा पवार महिला क्रिकेट संघात आहे. ती महाराष्ट्राची क्रिकेट प्लेअर आहे. उत्कर्षा सुद्धा पुण्याचीच असून ती महिलांच्या वरिष्ठ संघात खेळते.

टॅग्स :सायली संजीवऋतुराज गायकवाडसोशल मीडियालग्न