Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेशुद्ध प्रवासी, सोन्याची बिस्कीटं अन् त्या तिघी..; खळखळून हसवणारा 'क्रू' चा ट्रेलर एकदा बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 17:11 IST

करिना - क्रिती - तब्बूची भूमिका असलेला क्रू सिनेमाचा विनोदी ट्रेलर बघाच. हसून हसून दुखेल पोट

गेल्या अनेक दिवसांपासून करिना कपूर - तब्बू अन् क्रिती सेनन यांच्या 'क्रू' सिनेमाची उत्सुकता शिगेला होती. काहीच दिवसांपुर्वी सिनेमाचा धम्माल टिझर रिलीज झालेला. आता नुकतंच विनोदाने भरलेला 'क्रू' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये क्रिती - करिना आणि तब्बू या तिनही लोकप्रिय अभिनेत्रींची कमाल केमिस्ट्री बघायला मिळतेय. काय आहे ट्रेलरमध्ये?

या सिनेमात तब्बू, क्रिती सेनन आणि करीना कपूर एका फ्लाइट कंपनीच्या एअर होस्टेस आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. या तिघींना एका बेशुद्ध प्रवाशाने लपवलेली सोन्याची बिस्कीटं सापडतात. पुढे या तिघी या गोल्ड बिस्किटांची हेराफेरी कशी करतात, याची विनोदी कहाणी ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये दिलजीत दोझांस एअरपोर्ट कस्टम ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर कॉमेडियन कपिल शर्माची भूमिकाही खूप महत्त्वाची असल्याचं दिसतंय.

  'क्रू' चा ट्रेलर एक पूर्ण एन्टरटेनंमेंट पॅकेज आहे. अल्पावधीत या ट्रेलरला सोशल मीडियावर पसंती दिली गेलीय. तब्बू - क्रिती सेनन - करिना कपूर या तिघींची भन्नाट केमिस्ट्री सिनेमात दिसणार यात शंका नाही. हा सिनेमा २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   'क्रू' निमित्ताने करीना - तब्बू - क्रिती पहिल्यांदाच एकमेकींसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

 

टॅग्स :करिना कपूरतब्बूक्रिती सनॉनकपिल शर्मा दिलजीत दोसांझ