Join us
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus:शाहिद कपूरने केले नियमाचे उल्लंघन कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाउन असूनही जिम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 14:38 IST

शाहिद-मीरा यांच्यावर टीका होत असून नियमांचे उल्लंघन करून जिम उघडणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना व्हायरसची लागण झालेली प्रकरणं समोर आले आहेत. राज्य सरकारने काही मुख्य धार्मिक व पर्यटन स्थळ,थिएटर, मॉल, जिम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशामध्ये जिमबाहेर शाहिद कपूर आणि पत्नी मीरा स्पॉट झाले.

शासनाकडून खरदारी म्हणून देण्यात आलेले आदेश धाब्यावर बसवत नियमाचे उल्लंघन करत असल्याचे यामुळे समोर आले आहे. तसेच  शाहिद-मीरा यांनी जिमच्या बाहेर पत्रकारांना पाहिले तेव्हा ते दोघेही वेगवेगळ्या गेटमधून निघून गेले. या संपूर्ण प्रकरणावर शाहिद-मीरा यांच्यावर टीका होत असून नियमांचे उल्लंघन करून जिम उघडणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे.

अँटी ग्रॅव्हिटी क्लबचे संचालक युधिष्ठिर जयसिंग यांनी स्पष्टीकरण देताना जिम सुरु असल्याचे नाकारले आहे. शाहिदसह मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे शाहिद पत्नीसह फक्त भेटण्यासाठी आले होते असे सांगत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :शाहिद कपूरकोरोना वायरस बातम्या