Join us

'कोरोनाने मला निवडले...'; जितेंद्र जोशीला कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 13:38 IST

अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi)ला कोरोना (Corona Virus)ची लागण झाली आहे. त्याने ही माहिती खुद्द इंस्टाग्रामवर दिली आहे.

मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लसीचे दोन डोस घेऊन योग्य ती काळजी घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. दरम्यान आता समजते आहे की, अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi)ला कोरोना (Corona Virus)ची लागण झाली आहे. त्याने ही माहिती खुद्द इंस्टाग्रामवर दिली आहे.

जितेंद्र जोशीने कोरोनाची घरी टेस्ट केली, जी पॉझिटिव्ह आली आहे. त्याने फोटो शेअर करत लिहिले की, कोरोनाने मला निवडले. अत्यंत त्रासदायक आणि "ताप"दायक अनुभव आहे. ताप तर आहेच शिवाय डोकेदुखी, अंगदुखी आणि सर्व लक्षणे!! माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी ही विनंती. माझे RTPCR रिपोर्ट्स लवकरच मिळतील. वैद्यकीय उपचार सुरू आहेत. नेमका कुठला कोरोना आहे ते RTPCR रिपोर्ट आल्यावर कळेल.

बॉलिवूडनंतर मराठी सिनेइंडस्ट्रीतही कोरोनाचा कहरस्वरा भास्कर, विशाल दादलानी, कुब्रा सैत, ईशा गुप्ता यांना नुकतेच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतही काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात रुपाली भोसले, अंकुश चौधरीला कोरोना झाल्यानंतर आता जितेंद्र जोशीला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :जितेंद्र जोशीकोरोना वायरस बातम्या