Join us

पुनित जे पाठकच्या यशात आहे या व्यक्तीचा हातभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 15:33 IST

डान्स प्लसचा कप्तान पुनित जे पाठकनेही असाच हा प्रवास केला असून त्याने आपले हे स्वप्न आपल्या धाकट्‌या भावासोबत निशितसोबत जगले आहे. पुनित एक अव्वल डान्सर आणि कोरियोग्राफर बनण्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे.

डान्स प्लस या लोकप्रिय डान्स शोचा चौथा सिझन प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. ‘सपनें सिर्फ अपनें नहीं होते’ या संदेशासह लोकप्रिय डान्स शोमध्ये भारतातील भावी उत्तम डान्सिंग कलाकार मंचावर जादू निर्माण करणार आहेत. तसेच आपल्या या प्रवासात आपल्याला ज्यांनी साथ दिली, त्यांच्याविषयी सांगणार आहेत. आपल्या आयुष्यातील अनेक आठवणी ते शेअर करतील. डान्स प्लसचा कप्तान पुनित जे पाठकनेही असाच हा प्रवास केला असून त्याने आपले हे स्वप्न आपल्या धाकट्‌या भावासोबत निशितसोबत जगले आहे. पुनित एक अव्वल डान्सर आणि कोरियोग्राफर बनण्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे.

पुनित आपल्या भावाविषयी सांगतो, “माझा धाकटा भाऊ निशितलाही डान्सर बनायचे होते, पण माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या स्वप्नांचा त्याग केला. तो माझ्या वडिलांसमोर माझ्यासाठी उभा राहिला आणि मला कायमच समर्थन दिले. मी आमचा व्यवसाय सांभाळावा असे माझ्या वडिलांना वाटत होते. एक स्पर्धक, कोरियोग्राफर आणि आता मेन्टॉर अशा या माझ्या प्रवासात तो माझा सगळ्‌यात मोठा प्रेरणास्त्रोत आहे. निशित माझा प्लस आहे आणि सगळ्‌यांनाच त्याच्यासारखा भाऊ मिळावा असे मला वाटते. तो धाकटा असला तरी त्याने माझ्यासाठी केलेल्या त्यागासाठी मी त्याचा ऋणी आहे. यशाचा मार्ग मोठा आणि कठीण असून त्यात अनेक अडथळे येतात. माझ्याही मार्गात अनेक अडथळे आले. मला आज जे यश मिळाले आहे, ते मिळणे सोपे नव्हते. पण मला आनंद वाटतो की, माझा प्लस प्रत्येक वेळी माझ्यासोबत होता आणि त्याची मला माझ्या डान्सिंग करिअरमध्ये मदत झाली.”

कप्तान पुनित आणि त्याचा भाऊ हे डान्स प्लस सीझन ४ चा संदेश सपनें सिर्फ अपनें नहीं होतेचे एक उत्तम उदाहरण आहेत, ज्यातून अधोरेखित होते की महान बनण्याचा प्रवास हा दीर्घ आणि कठीण आहे, पण तो कधीच एकट्‌याचा नसतो.

डान्स प्लस हा कार्यक्रम ६ ऑक्टोबरपासून स्टार प्लसवर शनिवार-रविवारी रात्री ८ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :डान्स प्लस 4पुनित पाठक