Join us

Kareena Kapoor Pregnant: तैमुर आता 'दादा' होणार; सैफ-करिनाकडे पुन्हा 'गुड न्यूज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 16:35 IST

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे.

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. करिना कपूर पुन्हा एकदा आई होणार आहे. सैफ आणि करिनाच्या टीमकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. आम्हाला सांगण्यास आनंद होतो आहे की, एका नवा पाहुणा आमच्या कुटुंबात येणार आहे. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमाबदल धन्यवाद अशा शब्दात सैफ आणि करिनाने चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

तैमुर आता 3 वर्षांचा झाला आहे. दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी कुटुंबीय उत्सुक आहेत. आतापर्यंत ही गुडन्युज फक्त करिना आणि सैफच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना माहिती होती. मात्र आता करिना आणि सैफने अधिकृत स्टेटमेंट जारी करत ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे. करिना किती महिन्याची प्रेग्नेंट आहे याची माहिती अजून मिळालेली नाही. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, करीना लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसणार आहे. याशिवाय तिने करण जोहरचा मल्टीस्टारर सिनेमा 'तख्त'देखील साईन केला आहे. ज्यात तिच्यासोबत अनिल कपूर, विकी कौशल, रणवीर सिंग, आलिया भट, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर दिसणार आहेत.  

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान