Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला, दिसायला आहे हँडसम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 08:00 IST

श्रेयाचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं.

छोट्या पडद्यावरील कॉमेडी रिएलिटी शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली.श्रेयाचे अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं.श्रेया ही खूप चांगली अभिनेत्री असून ती सगळ्याच भूमिका खूपच छानप्रकारे पार पाडते. या सगळ्यामुळेच श्रेया प्रेक्षकांची प्रचंड लाडकी बनली आहे.श्रेयाला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॉलो करत असतात. श्रेयाचा जन्म हा पुण्यात एका मराठी कुटुंबात झाला असला तरी ती एका गुजराती कुटुंबाची सून आहे.

श्रेयाचे लग्न झालेले असून तिच्या पतीचे नाव निखिल सेठ आहे. त्यांचे लग्न २७ डिसेंबर २०१५ मध्ये झाले असून त्यांनी प्रेमविवाह केला आहे. श्रेया आणि निखिल यांची ओळख एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. या चित्रीकरणादरम्यान निखिल अनेकवेळा श्रेयासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. पण मैत्री न होता, त्यांच्यात काही कारणांनी वादच होत होते. या सगळ्यामुळे त्यांच्यात काही केल्या मैत्री होत नव्हती. पण निखिल एका मालिकेचा कार्यकारी निर्माता बनला आहे हे श्रेयाला कळल्यावर तिने त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आणि तिथून खऱ्या अर्थाने त्यांच्या संवादाला सुरुवात झाली.

त्यानंतर काहीच महिन्यात निखिलने श्रेयाला प्रपोज केले आणि तिने देखील नात्यासाठी होकार दिला. यानंतर दोघांच्या कुटुंबांच्या सहमतीने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाले असून त्यांचे कपल त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडते. 

टॅग्स :श्रेया बुगडे