Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉमेडीयन कपिल शर्माचं १९८३ क्रिकेट विश्वचषकाशी आहे खास नातं; वाचून तुम्हीही व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 14:07 IST

कपिल शर्मा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्याबद्दलची एक खास गोष्ट जाणून घ्या...

आपल्या विनोदी शैलीमुळे घराघरात पोहोचलेला कपिल शर्मा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. कपिल शर्मा नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतो. काल गुरूवार २ एप्रिल रोजी कपिलनं त्याचा वाढदिवस साजरा केला. अभिनेता आता ४४ वर्षांचा झाला आहे. कपिल हिंदी टेलिव्हिजनवरील मोठं नाव आहे.  मात्र, तुम्हाला माहीत आहे का? ज्या नावाने आज कपिल जगप्रसिद्ध आहे, ते नाव त्याला एका ऐतिहासिक विजयामुळे मिळालं होतं.

कपिल शर्माचा जन्म २ एप्रिल १९८१ रोजी झाला. जन्मानंतर बराच काळ त्याचं नाव काय ठेवावं, यावरून घरात विचार सुरू होता. त्यामुळे सर्वजण त्याला लाडाने 'छोटू' म्हणत असत. पण १९८३ मध्ये जेव्हा कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला विश्वचषक जिंकला, तेव्हा कपिलच्या कुटुंबाने एक मोठा निर्णय घेतला. भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी आपल्या लाडक्या 'छोटू'चं नाव दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्या नावावरून 'कपिल' असं ठेवलं.खुद्द कपिल शर्मानेच आपल्या शोमध्ये कपिल देव यांच्यासमोर हा खुलासा केला होता. "तुमच्यामुळेच लोकांनी मला 'छोटू' म्हणणं बंद केलं" असं म्हणत त्याने कपिल देव यांचे आभार मानले होते. 

 कॅनडा आणि दुबईत आहेत कॅफे

कपिल शर्माने केवळ टीव्हीवरच नाही, तर चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. कपिल त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे जे अभिनयाव्यतिरिक्त स्वत:चा वेगळा व्यवसायही करत आहेत. कपिल आणि त्याची बायको गिन्नीनं कॅनडामधील ब्रिटिश कोलंबियामध्ये एक कॅफे सुरू केला होता. ज्याचं नाव कॅप्स कॅफे असं आहे. यानंतर त्यांनी दुबईत ३१ डिसेंबर २०२५मध्ये याच कॅफेची दुसरी शाखा सुरू केली. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार कपिल शर्माची नेटवर्थ ३०० कोटींहून अधिक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kapil Sharma's name linked to India's 1983 World Cup win.

Web Summary : Comedian Kapil Sharma, born in 1981, was initially called 'Chotu'. After India's 1983 World Cup victory led by Kapil Dev, his family renamed him 'Kapil' to celebrate the historic win. Sharma also owns cafes in Canada and Dubai.
टॅग्स :कपिल शर्मा कपिल देव