Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉमेडियन कपिल शर्माला होता हा गंभीर आजार, पत्नीच्या मदतीने केली आजारावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 18:25 IST

कपिल शर्माला ते दिवस आठवतात आणि तो म्हणतो की त्याच्यासोबत काय होत आहे हे त्याला माहितही नव्हते.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा सगळीकडेच त्याच्या नावाची चर्चा होताना दिसत होती. तो यशाच्या शिखरावर पोहचला होता. २०१७-१८मध्ये कपिल शर्माचा शोदेखील बंद होता. तसेच असेदेखील वृत्त आले होते की कपिलने अचानक शूटिंग रद्द केले. असेही ऐकायला मिळाले की,  त्याने शाहरुख खान आणि अजय देवगण सारख्या कलाकारांना वाट पाहायला लावली. दरम्यान, त्याचा सहकलाकार सुनील ग्रोव्हरसोबतही त्याचे भांडण झाले. कपिलसाठी हा काळ चांगला जात नव्हता.

कपिल शर्माला ते दिवस आठवतात आणि तो म्हणतो की त्याच्यासोबत काय होत आहे हे त्याला माहितही नव्हते. एक दिवस त्याने वर्तमानपत्रात बातमी वाचली की कपिल शर्मा डिप्रेशनचा शिकार झाला. तेव्हा त्याला कळले की त्याला ही समस्या आहे. त्याने नंतर सांगितले की, 'त्या वृत्तपत्राच्या लोकांना शुभेच्छा ज्यांनी मला माझे काय झाले ते सांगितले'.  

कपिल शर्मा म्हणाला की 'त्यावेळी असे वाटते की काहीही बदलणार नाही कारण सर्व काही निगेटिव्ह दिसत असते. मेंदूमध्ये कोणती रसायने सोडली जातात हे मला माहित नाही जे सकारात्मक विचारांना परवानगी देत ​​नाही. पण अशा परिस्थितीत माझ्या कुटुंबाने विशेषतः माझी पत्नी गिन्नीने मला खूप मदत केली. माझ्या आयुष्यात काय चालले आहे, याबद्दल तिला सर्व काही माहित होते, इतर कोणालाही माहित नव्हते.

कपिल शर्मा पुढे म्हणाला की, 'माझी आई एका छोट्या गावातून आली आहे, तिला मानसिक आजार काय आहेत हे माहित नव्हते. तेच मला ही माहित नव्हते. कपिलला त्याची पत्नी गिन्नीने या काळात खूप सांभाळले आणि त्याला नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत केली.

टॅग्स :कपिल शर्मा