Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर हास्यजत्रा कलाकार गौरव मोरेने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 16:41 IST

Raju Srivastav: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची ही झुंज अखेर संपली आहे.

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांच्यावर मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची ही झुंज अखेर संपली आहे. आज सकाळी त्यांचे निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या निधनाने सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अनेक बॉलिवूड कलाकरांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मराठीमधील कलाकारांनीदेखील श्रद्धांजली वाहिली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे(Gaurav More)नेदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता गौरव मोरेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर राजू श्रीवास्तव यांचा फोटो शेअर केला आहे  ‘आम्ही तुम्हाला मिस करू सर’ असा कॅप्शनदेखील त्याने दिला आहे. 

राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध कॉमेडियन होते. ते अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ यासारख्या कार्यक्रमांमधून त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले आहे. त्यांची गणना देशातील सर्वोत्कृष्ट हास्यकलाकारांमध्ये केली जाते.

राजू श्रीवास्तव अमिताभ बच्चन यांचे खूप मोठे चाहते होते. करियरच्या सुरूवातीला ते विनोदी कार्यक्रम करताना अमिताभ बच्चन यांची नक्कल करायचे. त्याचबरोबरीने दिलीप कुमार शशी कपूर यांची नक्कलदेखील ते करायचे. बॉलिवूडमधील कलाकारां व्यतिरिक्त लालू प्रसाद यादव यांच्यासारख्या राजकारणी लोकांच्या नकलादेखील त्यांनी केल्या आहेत.

टॅग्स :राजू श्रीवास्तव