Join us

'रंग माझा वेगळा'मध्ये या अभिनेत्याचं कमबॅक, मालिकेत येणार नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 15:29 IST

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून बरेच टर्न आणि ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता मालिकेत पुन्हा या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. हा अभिनेता कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात ना. हा अभिनेता म्हणजे मालिकेत सुजयची भूमिका साकारणारा निखिल राजेशिर्के. निखिल लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे आणि त्याच्या एन्ट्रीमुळे पुन्हा मालिकेला वेगळं वळण प्राप्त होणार आहे.

रंग माझा वेगळा मालिकेच्या नव्या प्रोमोत पाहायला मिळत आहे की, आयशाचा पर्दाफाश झाल्यामुळे कार्तिकच्या मनातील स्थान कमी होते आणि आता मुलींमुळे का होईना दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यातील दुरावा कमी होताना दिसत आहे. त्या दोघांना कायमचे एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी सौंदर्या सुजयला शोधून काढायचे ठरवते. आदित्य त्याचा पत्ता शोधून काढतो. आता सुजयला डीएनए टेस्ट करून तो कार्तिकी व दीपिकाचे वडील नाही हे सिद्ध होईल, असे सौंदर्या ठरवते. त्यामुळे आता सुजय डीएनए टेस्टला तयार होईल का आणि सौंदर्या व आदित्यचं बोलणं श्वेता चोरून ऐकते. त्यामुळे ती पुन्हा काही कारस्थान करेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

रंग माझा वेगळा मालिकेत सुजयची भूमिका अभिनेता निखिल राजेशिर्के साकारतो आहे. या मालिकेत रिएन्ट्री करण्यापूर्वी तो बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये सहभागी झाला होता. मात्र तो लवकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. बिग बॉस मराठीच्या घरात जाण्यापूर्वी तो माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत पाहायला मिळाला होता. 

टॅग्स :स्टार प्रवाह