Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी'नंतर सुरू झालेली लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, शेवटच्या सीनचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 10:38 IST

कलर्स मराठीवर सध्या बिग बॉस मराठीचा सहावा सीझन प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. अशातच एक मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

कलर्स मराठीवर सध्या बिग बॉस मराठीचा सहावा सीझन प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. अशातच एक मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझननंतर सुरू झालेली मैत्रीची गोष्ट सांगणारी 'पिंगा गं पोरी पिंगा' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पूर्ण झालं. लाडकी मालिका निरोप घेणार असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेच्या शेवटच्या शूटचे काही फोटो शेअर करत प्रोडक्शन टीमकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की "आज पिंगा गं पोरी पिंगाच्या शूटचा शेवटचा दिवस आहे…आणि मनात खूप वेगवेगळ्या भावना आहेत. एकीकडे आनंद आहे की आपण सगळ्यांनी मिळून इतका सुंदर प्रवास पूर्ण केला, आणि दुसरीकडे थोडीशी खंतही आहे की रोजचे हे शूटिंगचे क्षण, हसणं-मस्करी, आणि सगळ्यांसोबत घालवलेला वेळ आता फक्त आठवणी बनून राहणार आहेत. हा शो आमच्यासाठी फक्त काम नव्हता, तर एक कुटुंब बनलं होतं. सेटवरची ऊर्जा, सगळ्यांची मेहनत, आणि पडद्यामागे घडणारे सुंदर क्षण या सगळ्यामुळे हा प्रवास खूप खास झाला".

"कास्ट, क्रू आणि या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार. तुमच्यामुळे हा अनुभव इतका सुंदर आणि अविस्मरणीय झाला. अशा अप्रतिम टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली यासाठी आम्ही खूप कृतज्ञ आहोत. आज शूटचा शेवटचा दिवस असला तरी या प्रवासाच्या आठवणी, मैत्री आणि अनुभव कायम आमच्या मनात राहतील. या सुंदर प्रवासाचा भाग बनवल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद", असं पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे. 

'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेचा पहिला भाग २८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसारित झाला होता. जवळपास दीड वर्ष मनोरंजन केल्यानंतर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रसारित होईल, हे अद्याप कळलेलं नाही. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत विदिशा म्हसकर, आकांक्षा गाडे, प्राजक्ता परब, शाश्वती पिंपळकर, ऐश्वर्या शेटे यांच्या मुख्य भूमिका होत्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Popular Marathi series 'Pinga Ga Pori Pinga' to bid farewell soon.

Web Summary : Colors Marathi's 'Pinga Ga Pori Pinga', a story of friendship that began after 'Bigg Boss Marathi 5', is ending. The last shoot wrapped up recently, leaving fans disappointed after nearly a year and a half of entertainment.
टॅग्स :कलर्स मराठीटिव्ही कलाकार