Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेटवर सुरु झालेली कथा, अस्तित्वात उतरेल का? छोट्या पडद्यावरील 'मोहिनी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:07 IST

मनोरंजन सृष्टीचा झगमगाट, चाहत्यांची वेडी गर्दी आणि स्टारडमचा दिमाख...या सगळ्यांच्या मागे दडलेला संघर्ष, स्वप्नं आणि भावनांचा गुंता आणि त्यातून उलगडणारी RK आणि मोहिनीची प्रेमकथा, नवी मालिका ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

चंदेरी दुनियेचं आकर्षण, सोन्याच्या पडद्याची जादू याला भुरळ पडत नाही असं कोणीच नाही. आजवर अनेक प्रेमकथा पाहिल्या आपण, पण ही प्रेमकथा आहे थोडी वेगळी कारण ही आहे अशा दोन व्यक्तींची कथा, ज्यांच्या आयुष्यात प्रेमापेक्षा स्वाभिमान आणि अहंकार आधी येतात. मनोरंजन सृष्टीचा झगमगाट, चाहत्यांची वेडी गर्दी आणि स्टारडमचा दिमाख...या सगळ्यांच्या मागे दडलेला संघर्ष, स्वप्नं आणि भावनांचा गुंता आणि त्यातून उलगडणारी RK आणि मोहिनीची प्रेमकथा, नवी मालिका ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

फिल्मी सेटवर जन्मलेली एक साधी मुलगी आणि त्याच जगावर राज्य करणारा सुपरस्टार. नियती, अहंकार आणि स्वाभिमान यांच्या संघर्षातून उभी राहणारी ही कथा प्रेक्षकांना एका भावनिक प्रवासावर घेऊन जाणार आहे. जगण्याने मोहिनीला खूप काही शिकवलं आहे. ती एक लढवय्यी, संकटांना सामोरं जाणारी, बहुआयामी आणि अत्यंत स्ट्रीट-स्मार्ट स्त्री आहे. पडद्यामागच्या जगात वाढलेली ही मुलगी स्वतःच्या बळावर जगाला सामोरी जाते. जगण्यासाठी सुरू झालेला तिचा प्रवास पुढे जाऊन ताकद, प्रेम आणि स्वतःचं स्थान शोधण्याच्या प्रवासात बदलतो. मोहिनीचं एकच ध्येय आहे, स्वतःचं आयुष्य सन्मानाने उभं करणं आणि तिच्या आईचा हरवलेला सन्मान व गौरव पुन्हा मिळवणं. आता मोहिनी हे सगळं कसं मिळवणार? कुठली संकटं तिच्या वाट्याला येणार? हे मालिकेत हळूहळू उलगडणार आहे.

RK म्हणजेच समीर परांजपे म्हणाला, "मोहिनी मालिकेच्या निमित्तानं कलर्स मराठीवर पुन्हाएकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे याचा आनंद आहे. घरी आल्याचा भाव आहे. प्रत्येक अभिनेत्याला वेगळ्या धाटणीच्या भूमिका कराव्यात अशी इच्छा असते कारण एकप्रकारची भीती असते आणि ती म्हणजे आपण typecast तर होणार नाहीना. मी आभारी आहे कलर्स मराठीचा की मला पुन्हा वेगळं पात्र साकारण्याची संधी दिली... ज्याचा कॅनव्हास वेगळा आहे, कथा वेगळी आहे. मोहिनी मालिकेसारखं कथानक मला वाटतं नाही मराठी टेलिव्हिजनवर झालं आहे. अशा कथानकच भाग होण्याची संधी मिळणे माझं भाग्य आहे असं म्हणेन. अशी मालिका करणं खूप मोठं धाडस आहे. नवीन शो, नवी भूमिका जो माझं पिंड नाही हे खूप मोठं आव्हानं आहे. मी कधी न साकारलेलं पात्र करतो आहे हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव आहे... मी रोज नव्याने हे पात्र जगतो आहे. प्रेक्षकांना नक्कीच बघायला मज्जा येणार आहे याची खात्री आहे."

‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ प्रेक्षकांना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणार आहे. जसजशी मोहिनी स्वतःचा मार्ग शोधू लागते, तसतशी ती त्या फिल्म इंडस्ट्रीमध्येच स्वतःची ओळख निर्माण करू लागते ज्याच्या झगमगाटात कधीकाळी तिचं अस्तित्वच झाकोळलं गेलं होतं. या मालिकेत विश्वासघात, सूड, ओळख आणि जिद्द यांसारख्या प्रभावी भावनांचा वेध घेत प्रेक्षकांना बॉलिवूडच्या चकाकीमागील गडद वास्तवाचा एक भावनिक रोलरकोस्टर अनुभवायला मिळणार आहे. पडद्यामागच्या संघर्षातून स्वतःचं स्थान निर्माण करणारी मोहिनी आणि अहंकाराच्या भिंतीत अडकलेला सुपरस्टार RK यांच्या आयुष्यात नियती काय वळण आणणार हे पाहण्यासाठी नक्की पहा ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ २३ मार्चपासून दररोज संध्या. ७:३० वा., फक्त कलर्स मराठीवर. मालिकेत कलाकारांची भक्कम फळी पाहायला मिळणार आहे.   शालिनी (सोनाली पंडित नाईक), महेंद्र (शंतनू मोघे), ललिता (श्वेता मेहेंदळे),RK (समीर परांजपे), मोहिनी म्हणजेच अनघा ठाकूर आणि प्रताप (सुशील विश्वकर्मा) हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Will on-set love story become reality? 'Mohini' soon on screen.

Web Summary : Colors Marathi's 'Mohini' unveils RK and Mohini's unique love story amidst showbiz struggles. A fighter, Mohini seeks respect, battles challenges, and finds love. The series explores ambition, betrayal, and Bollywood's reality, premiering March 23rd at 7:30 PM.
टॅग्स :कलर्स मराठीटिव्ही कलाकार